शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शांतता व सुव्यस्थेसाठी ९० जण स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:20 IST

जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींची निवडणूक तसेच होळी या सणादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने कलम ६८ अंतर्गत तब्बल ९० जणांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी केली.

ठळक मुद्देकलम ६८ अंतर्गत कोंम्बिग : पोलीस विभागाची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींची निवडणूक तसेच होळी या सणादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने कलम ६८ अंतर्गत तब्बल ९० जणांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी केली. ही मोहीम २४ मार्च रोजीपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तसेच दारूविक्री, तस्करी आणि दारूनिर्मिती आदी गुन्हे दाखल असलेल्यांची यादीच पोलीस विभागाकडे आहे. यंदाची होळी ग्रामपंचायत आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान आल्याने या कालावधीत कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिल्या होत्या. त्याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून २० मार्चपासून विशेष मोहीम हाती घेऊन अवैध व्यवसाय करणारे व गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांना कलम ६८ अन्वये ताब्यात घेण्यासंबंधीची कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २१ मार्चला ही मोहीम प्रभावीपणे राबवून तब्बल ९० जणांना ताब्यात घेत त्यांना स्थानबद्ध केल्याचे सांगण्यात आले. यात पो.स्टे. वर्धा येथे ८, रामनगर ६, वडनेर ७, आष्टी ४, सावंगी (मेघे) ५, खरांगणा ६, सेवाग्राम २, कारंजा ४, पुलगाव १, तळेगाव १, सिंदी रेल्वे १३, सेलू ५, हिंगणघाट १२, समुद्रपूर ४, दहेगाव ३, देवळी ४ व गिरड पोलीस ठाण्यातील ५ जणांचा समावेश आहे.रविवारपर्यंत सुरू राहणार मोहीमबुधवार २० मार्च पासून सुरू करण्यात आलेली ही मोहीम रविवार २४ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. कलम ६८ अन्वये ताब्यात घेण्यात आलेल्याला पोलीस जास्तीत जास्त २४ तास स्थानबद्ध करून ठेवत असून त्यांची कलम ६९ अन्वये सुटकाही करण्यात येते. विशेष म्हणजे ताब्यात असलेल्याला मतदान करण्यासाठी काही सवड दिली जात असते, असे सांगण्यात आले. २० मार्चलाही ही मोहीम राबवून काहींना ताब्यात घेत स्थानबद्ध करण्यात आले होते.

टॅग्स :Policeपोलिस