शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

77 आदिवासींनी दर्शविली शेती करण्यास असमर्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 05:00 IST

कुठल्याही आदिवासी बांधवास भूमिहीन करणे हे कायद्यान्वये गुन्हाच आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक आदिवासी बांधवांची जमीन बेकायदा हडपत काहींना तर थेट भूमिहीन करण्यात आल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर मागील नऊ वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ७७ आदिवासी बांधवांनी शेती करण्यास असमर्थता दर्शविल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विज्ञान युगात वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर ‘वावर है तो पावर है’ असे बोलले जाते. पण जिल्ह्यातील तब्बल ७७ आदिवासी बांधवांनी शेती करण्यास असमर्थताच दर्शविल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे आदिवासी बांधव शेतीला दुय्यम स्थानच देत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.कुठल्याही आदिवासी बांधवास भूमिहीन करणे हे कायद्यान्वये गुन्हाच आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक आदिवासी बांधवांची जमीन बेकायदा हडपत काहींना तर थेट भूमिहीन करण्यात आल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर मागील नऊ वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ७७ आदिवासी बांधवांनी शेती करण्यास असमर्थता दर्शविल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.जिल्हास्तरीय विशेष चौकशी समिती गठित करून जिल्ह्यातील आठही तालुक्यात नेमक्या किती आदिवासींची जमीन बेकायदा हडपण्यात आली तसेच किती आदिवासी बांधवांना भूमिहीन करण्यात आले याची शहानिशा प्रशासन स्तरावर झाल्यास बडे भूमाफियांच गळाला लागण्याची शक्यता आहे. आदिवासींना भूमिहीन करणाऱ्यांसह आदिवासींची शेतजमीन हडपणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. विशेष म्हणजे दोषींना कठोर शिक्षाही होऊ शकत असल्याचे सांगण्यात आले.

आदिवासी ते आदिवासींचे १६ प्रकरणे प्रलंबित-    सन २०१२-१३ ते आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ६४ आदिवासी बांधवांनी शेती करण्यास असमर्थता दर्शवित आपली शेत आदिवासीलाच विक्री करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली. त्यापैकी ४८ व्यक्तींचे प्रस्ताव निकाली काढण्यात आले असून उर्वरित १६ प्रस्ताव विविध त्रुट्यांमुळे प्रलंबित आहेत.

१३ आदिवासींची प्रकरणे मुंबई दरबारी धूळखात-    मागील नऊ वर्षांच्या काळात जिल्ह्यातील तेरा आदिवासी बांधवांनी शेती करण्यास असमर्थता दर्शवित आपली शेतजमीन गैर आदिवासीला विक्री करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मुंबई मंत्रालयात प्रस्ताव पाठविले आहेत. पण त्यापैकी केवळ एक प्रस्ताव आतापर्यंत निकाली काढण्यात आला असून उर्वरित बारा प्रकरणे अजूनही मुंबई दरबारी धूळखात आहेत.

प्रस्तावासाठी ही लागतात कागदपत्रे-  आदिवासी ते आदिवासी किंवा आदिवासी ते गैर आदिवासी जमीन विक्री परवानगीसाठी अर्ज,सातबारा,आठ ‘अ’, नकाशा,विक्रीचा करारनामा,सन १९५४-५५ चा अधिकार अभिलेख, कुटुंबातील इतर व्यक्तींचे संमतीपत्र/शपथपत्र,विकत घेणारा शेतकरी असल्याबाबतचा पुरावा,जिल्हा शक्य चिकित्सक यांचे शेती करण्यास असमर्थ असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र,शेती लाभ क्षेत्रात येत नसल्याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे प्रमाणपत्र आदी कागदपत्र क्रमप्राप्त आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरी