शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

दीड वर्षांत ७०७ सर्पदंश

By admin | Updated: August 7, 2016 00:12 IST

पावसाळ्याच्या दिवसांत शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे.

सहा जणांचा मृत्यू : जिल्ह्यात मुबलक औषधीसाठा रूपेश खैरी वर्धा पावसाळ्याच्या दिवसांत शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे. यात वेळीच उपचार मिळाला तर त्यांचे प्राण वाचणे शक्य असल्याचे वर्धा जिल्ह्यात दिसून आले आहे. जिल्ह्यात गत दीड वर्षात ७०७ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. यातील केवळ सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. ही आकडेवारी शासकीय असून हा आकडा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय अशा एकूण आठ रुग्णालयांत गत दीड वर्षांत सर्पदंश झालेले एकूण ६३२ रुग्ण उपचाराकरिता दाखल झाले. यात २०२५-१६ या आर्थिक वर्षात ५६६ सर्पदंशाच्या रुग्णाची नोंद करण्यात आली असून यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर याच आठ रुग्णालयांत सुरू वार्षिक सत्रात सर्पदंशाचे ६६ रुग्ण दाखल झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्यात जिल्हा आरोग्य विभागाला यश आले असून यातील एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती आहे. तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सन २०१५-१६ या आर्थिक वर्षांत सर्पदंश झालेले एकूण ६५ रुग्ण दाखल झाले होते. त्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सुरू वर्षांत केवळ १० रुग्ण आले असून त्यांच्यावर उपचार झाल्याने कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाने मागविली सर्पमित्रांची माहिती साप म्हणताच अनेकांच्या अंगावर काटा उभा झाल्याशिवाय राहत नाही. सापांची भीती सर्वसमान्यांना वाटत असल्याने वर्धेत सापांपासून त्यांच्या बचावाकरिता व सर्परक्षणाकरिता जिल्ह्यात अनेक सर्पमित्र पुढे आले आहेत; मात्र त्यांची कुठलीही नोंद जिल्ह्याच्या वनविभागात नाही. शिवाय त्यांच्याकडून पकडण्यात येत असलेल्या सापांची नोंदही वन विभागाकडून कुठेच करण्यात येत नसल्याने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्पमित्रांची माहिती गोळा करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने देण्यात आल्याची माहिती आहे. वर्धेत २० च्या वर सर्पमित्र कार्यरत जिल्ह्यात घरोघरी निघणारे साप पकडण्याकरिता वर्धा, हिंगणघाट, आर्वी व समुद्रपूर या तालुक्यात एकूण २० सर्पमित्र असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून साप पकडून तो वनविभागाच्या स्वाधीन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. असे कधी कधीच होत असून सर्पमित्रच पकडलेले साप शहरालगत असलेल्या जंगलात सोडत असल्याचे दिसून आले आहे. या सर्पमित्रांसह सापांची कुठेच नोंद होत नाही.