शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

६०० पोलिसांचे क्रीडा प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 23:48 IST

स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर तीन दिवस नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाच जिल्ह्यातील सहाशे खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपले क्रीडा प्रदर्शन दाखविले.

ठळक मुद्देअर्जुुन पुरस्कार विजेत्या ललीता बाबर यांचे हस्ते झाला सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर तीन दिवस नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाच जिल्ह्यातील सहाशे खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपले क्रीडा प्रदर्शन दाखविले. या स्पर्धेचा गुरुवारी दुपारी ४ वाजता समारोप झाला.पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमात अर्जुन पुरस्कार विजेत्या ललीता बाबर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळीअध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मलिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी परिक्षेत्रीय पोलीस विभागाकडून मानवंदना स्विकारून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी सर्वोत्कृष्ट पुरूष खेळाडू म्हणून वर्ध्याच्या पोलीस मुख्यालयातील दीपक ठाकरे व सवोत्कृष्ट महिला खेळाडू सुनैना डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. पुरूष व महिला जनरल चॅम्पीयनशिप चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाने पटकावली. तर वर्धा पोलीस विभागाला व्दितीय स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल, खो-खो, कबड्डी, बॉक्सींग, ज्युडो, वेटलिफ्टींग, अ‍ॅथेलॅटिक्स या मैदानी खेळांचा समावेश होता. चंद्रपूर, वर्धा, नागपूर ग्रामीण, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील एकूण ६०० पोलीस खेळाडूंनी या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करुन विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांचेही कौतूक करुन पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यानागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक बबन मोहंदुळे, शालिक उईके, बोरकुटे, सूर्यवंशी, घरडे, दत्तात्रय गुरव व पोलीस कर्मचारी दिलीप थाटे, चंदकांत जिवतोडे, आरीफ खान, रंजीत यादव, गजानन कठाणे, रंजीत काकडे, रवींद्र वानखेडे, रवी रामटेके, देवेंद्र उडाण, विनोद रघाटाटे या यांनी अथक परिश्रम घेतले.

टॅग्स :Policeपोलिस