शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

५३८ किलो खाद्यतेल जप्त

By admin | Updated: September 21, 2015 01:55 IST

आष्टी येथील दुकानांत विक्रीसाठी साठविलेल्या खाद्य तेलाच्या बॅरलवर कुठल्याही प्रकारचे लेबल, बॅच नंबर, उत्पादन दिनांक, उत्पादकाचा पत्ता आदी नमूद नव्हते.

भेसळयुक्त तेलाची होत होती विक्री : पेठ अहमदपूर येथील कारवाई

वर्धा : आष्टी येथील दुकानांत विक्रीसाठी साठविलेल्या खाद्य तेलाच्या बॅरलवर कुठल्याही प्रकारचे लेबल, बॅच नंबर, उत्पादन दिनांक, उत्पादकाचा पत्ता आदी नमूद नव्हते. यामुळे अन्न व औषधी प्रशासनाने कारवाई करीत तीन बॅरल जप्त केले. सदर बॅरलवर तेलाचे व मातीचे अत्यंत घाणेरडे किटण साचलेले असल्याने ते आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे कारवाईदरम्यान सांगण्यात आले.अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी रविवारी मे. भूषण किराणा स्टोअर्स, पेठ अहमदपुर ता. आष्टी येथे भेट दिली. सदर दुकानात विक्रीसाठी खाद्यतेलाचे तीन बॅरल साठविल्याचे आढळले. सदर खाद्य तेलाच्या बॅरलची तपासणी केली असता बॅरलवर माती व तेलाचे घाणेरडे किटण लागलेले होते. बॅरलवर कुठल्याही प्रकारचे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत लेबल नव्हते. यामुळे सदर बॅरलवर बॅच नंबर, उत्पादन दिनांक, बेस्ट बिफोर दिनांक तसेच उत्पादकाचा पत्ता आदी तपशीलही नमूद नव्हता. परिणामी, सदर खाद्यतेल केव्हा निर्मित झाले व कोणत्या तारखेपर्यंत खाण्यास योग्य आहे, याचा कुठलाही खुलासा होत नव्हता. सदर खाद्यतेल हे कोणते आहे, याचाही उलगडा होत नव्हता. सदर खाद्यतेल हे रिफार्इंड सोयाबीन तेल आहे, असे दुकान मालकाने सांगितले. विक्रेत्याकडे बॅरल खरेदीबाबत कुठलेही बिल नव्हते. कुणाकडून खरेदी केले याचाही दुकान मालकाने खुलासा केला नाही. यामुळे भेसळीची शक्यता असल्याने बॅरलमधून विश्लेषणास्तव नमुना घेत उर्वरित तीन बॅरलधील ५३८ किलो ४०० ग्रॅम तेलाचा साठा किंमत ३४ हजार ९९६ रुपये जप्त करण्यात आला. यातील नमुना विश्लेषणाकरिता पाठविला असून पुढील कारवाई विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी सहायक आयुक्त (अन्न) एम.सी. पवार यांच्या मार्गदर्शनात केली. अन्न, जन स्वास्थ व जन आरोग्याच्या दृष्टीने असे खाद्यतेल खाण्याचे टाळावे, असे आवाहन नागपुर विभाग सहआयुक्त एस.एस. देसाई यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)