शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

वर्धेत दिवसाला ५२ हजार लिटर पेट्रोल-डिझेल जळते!

By admin | Updated: December 17, 2015 02:04 IST

‘नो व्हेईकल डे’ वर्धेतही सहज शक्य’ या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’ने ठेवलेला प्रस्ताव स्वागतार्ह आहे.

‘नो व्हेईकल डे’चा जागर : दर आठवड्यात ही बचत झाल्यास वायू प्रदूषणालाही आळा बसणारराजेश भोजेकर वर्धा‘नो व्हेईकल डे’ वर्धेतही सहज शक्य’ या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’ने ठेवलेला प्रस्ताव स्वागतार्ह आहे. अशा भावना व्यक्त करीत ‘लोकमत’ने घेतलेल्या या इनिशिएटिव्हचे वर्धेकरांनी जोरदार स्वागत केले. वर्धेत वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची स्थिती जाणून घेतली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. शहरात व सभोवताल १० पेट्रोलपंप आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहा पेट्रोलपंपवरुन दररोज २४ हजार लिटर पेट्रोल आणि २८ हजार लिटर डिझेलची विक्री होते. पेट्रोलचा दर प्रतिलिटर ६५.९३ रुपये इतका आहे. दररोज १५,८२,३२० रुपयांचे पेट्रोल वाहनात टाकल्या जाते. डिझेलचा प्रतिलिटरचा दर ५२.७० रुपये इतका आहे. या मानाने दररोज १४,७५,६०० रुपयांच्या डिझेलची विक्री होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीची बेरीज केल्यास दररोज वर्धेकर ३०,५७,९२० रुपयांचे इंधन वाहनासाठी खरेदी करतात. महिन्याकाठी हा आकडा ९ कोटी १७ लाख ३७ हजार ६०० रुपयांवर जातो. वर्षभराचा विचार केल्यास हा आकडा ११० कोटी ८ लाख ५१ हजार २०० इतका होतो. आठवड्यातून एक दिवस याप्रमाणे महिन्यातून निदान चार दिवस वर्धेकरांनी ‘नो व्हेईकल वा सायकल डे’ पाळल्यास १ कोटी २२ लाख ३१ हजार ६८० रुपयांची बचत करता येणे शक्य आहे.नैसर्गिक वातावरणात जीवन जगण्याचा आनंद तर मिळणारच शिवाय शरीराचा व्यायाम आणि समाज सुदृढ करण्यासाठी उचललेले हे एक मोठे पाऊल ठरेल. यासाठी आता आठवड्यातील कोणताही एक दिवस ठरविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.आठवड्यातील एक दिवस ‘नो व्हेईकल वा सायकल डे’ पाळल्यास महिनाभरात एक कोटींचे इंधन बचतचंद्रपुरात ‘नो व्हेईकल डे’ सुरू झाल्यानंतर आता वर्धेतही नो व्हेईकल डेचा जागर सुरू झाला आहे. ‘लोकमत’च्या या पर्यावरणपूरक प्रस्तावाचे वर्धेकरांकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. इतकेच नव्हे, तर यावर वर्धेकरांमध्ये सकारात्मक विचारमंथनही होत आहे. हा उपक्रम आठवड्यातून एक दिवस राबविल्यास वर्धेकरांचे पेट्रोल-डिझेलसाठी खर्च होणारे ३० लाख ५७ हजार ६०० रुपये वाचतील. महिन्यातून चार दिवसही हा दिवस पाळला, तर ही बचत तब्बल १ कोटी २२ लाख ३१ हजार ६८० रुपयांच्या घरात जाईल. यासोबतच पर्यावरण बचाव होईल, शिवाय शहरातील वाहतुकीच्या कोंडीपासून महिन्यातून चार दिवस सुटका होईल. वाहनांच्या धुरांड्यामुळे होणार होणारे प्रदूषण काही प्रमाणात कमी करण्यात यश येईल. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मदत मिळेल, असे अनेक फायदे या माघ्यमातून होणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नो व्हेईकल वा सायकल डे’ जाहीर करावा!जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातला कोणताही एक दिवस ‘नो व्हेईकल वा सायकल डे’ म्हणून जाहीर करावा. ही सुरुवात शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपासून झाल्यास या मोहीमेत वर्धेकर आपुलकीने सहभागी होतील, असा सूरही वर्धेकरांमध्ये उमटत आहे.‘लोकमत इनिशिएटीव्ह’चे वर्धेकरांकडून जोरदार स्वागत‘नो व्हेईकल डे’ वर्धेतही सहज शक्य’ या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’ने ठेवलेल्या प्रस्तावाचे वर्धेकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. अनेकांनी भ्रमणध्वनीवरुन हा उपक्रम वर्धेत सुरू झाल्यास आम्ही त्यात सहभागी होऊ अशा भावनाही यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. प्रत्येकांची या उपक्रमात सहभागी होण्याची मनोमन इच्छा आहे. मात्र पुढाकार कोण घेणार, याची प्रत्येकांना वाट असल्याचा सूरही यामाध्यमातून पुढे आला आहे.‘सोशल’ मीडियावर जागर‘नो व्हेईकल डे’ वर्धेतही सहज शक्य’ हे वृत्त बुधवारी सकाळपासूनच विविध सोशल मीडियावर फिरत आहे. यामाध्यमातून प्रस्तावाबाबत जागर सुरू आहे.