शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

निम्न वर्धा प्रकल्पातून होणार ५०५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 20:12 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला सामंजस्य करार

आर्वी : निम्न वर्धा प्रकल्पातून तब्बल ५०५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासासाठी राज्याच्या महानिर्मिती आणि केंद्राच्या सतलज जल विद्युत निगम लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

निम्न (लोअर) वर्धा प्रकल्प नजिकच्या वरुड-धानोडी येथील वर्धा नदीवर आहे. यावर प्रस्तावित तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाकरिता महानिर्मितीने व्यवहार्यता सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार ७३२ हेक्टर जलक्षेत्राची निवड केली जाणार आहे. विकासकामांसाठी ३०३० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. वार्षिक हरित ऊर्जा निर्मिती १०५१.२८ दशलक्ष युनिट्स अपेक्षित असून ३६ महिन्यांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

तरंगता सौरऊर्जा प्रकल्पामुळे राज्यात सौरऊर्जा निर्मितीला चालना मिळेल. नूतनीकरण योग्य बंध पूर्ण करण्यास, सौरऊर्जा प्रकल्प स्थापित क्षमतेचे आणि निर्मितीचे समतुल्य उत्सर्जन टाळून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. यातून पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी महाग जीवाश्म इंधन खरेदी टाळता येईल. प्रस्तावित ५०५ मेगावॅटच्या क्षमतेला लक्षात घेत, वार्षिक सीओ२ उत्सर्जन जवळपास आठ लाख ६२ हजार ४९ टन कमी होईल. 

वार्षिक कोळशाचाही वापर आठ लाख ४९ हजार ४३४ टनाने कमी होण्यास मदत मिळेल. प्रकल्पात ४९ टक्के सहभाग सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि ५१ टक्के सहभाग महानिर्मितीचा राहणार आहे. या करारावर गुरुवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. करार करताना महानिर्मिती आणि सतलज जल विद्युत निगम लिमिटेड, जलसंपदाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

१४०० जणांना मिळणार रोजगारया प्रकल्पामुळे आर्वी तालुक्याने उद्योग व रोजगार निर्मितीकडे पहिली झेप घेतली आहे. या प्रकल्पामुळे जवळपास १४०० व्यक्तींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बेराेजगारी कमी होण्यासही मदत मिळणार आहे.

आर्वी तालुक्यातील धानोडी येथील लोअर वर्धा प्रकल्पावर ५०५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पास राज्य सरकारने मान्यता दिली. केंद्राच्या सतलज जलविद्युत निगम व राज्याची महानिर्मिती संयुक्तपणे ३०३० कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पातून १४०० व्यक्तींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.- सुमित वानखेडे, आर्वी

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस