शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानाच्या तक्रारीला ५० दिवस लोटले; पंचनाम्याची प्रतीक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 17:12 IST

पीकविमा कंपनी अधिकाऱ्यांची मनमानी : सोयाबिन पिकांची ९० टक्के झाली काढणी

लोकमत न्यूज नेटवर्क विजयगोपाल: देवळी तालुक्यातील विजयगोपाल महसूल मंडळात ३१ ऑगस्टला अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या संदर्भात तक्रारीही केल्या. मात्र, याला ५० दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. आजघडीला ९० टक्के सोयाबीन पिकाची काढणी झाल्याने कंपनीच्या आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांत तीव्र असंतोष आहे.

शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांना झालेल्या पिकाच्या नुकसानभरपाईसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविली आहे. शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभ घेण्यासाठी फक्त एक रुपयात शेतकऱ्यांना विमा काढून दिल्या गेला. वर्धा जिल्यात शासनाकडून आयसीआयसीआय लोम्बर्ड कंपनीने योजनेचे काम घेतले. हजारो शेतकऱ्यांनी हा पीक विमा काढलेला आहे. परंतु विमा काढल्यापासून तक्रार टाकल्यापासून आज जवळपास ५० दिवस झाले. जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी झाली. तरीही शेतकऱ्याच्या शेतात अजूनही पंचनामे झाले नाही, विजयगोपाल महसूल मंडळात ३१ ऑगस्टला अतिवृष्टी झाली होती. १४४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. नुकसानाच्या ७२ तासांच्या आत तक्रारी केल्यास २५ दिवसांच्या आत पंचनामे केले जातील, असे सांगण्यात आले होते. परंतु तक्रारी टाकल्यापासून ५० दिवस पूर्ण झाले तरी पंचनामे करण्यात आले नाही. 

मंडळात १२०० तक्रारी विजयगोपाल महसूल मंडळात नुकसान झाल्याच्या १ हजार २०० तक्रारी आल्याचे कंपनीच्या तालुका कार्यालयातून कळविण्यात आले. आतापर्यंत निम्म्या तक्रारीचे पंचनामे झाले असून, अजून जवळपास ६०० ते ७०० तक्रारींचे पंचनामे व्हायचे असल्याचे बोलले जात आहे. एकट्या विजयगोपालमधील २०० पंचनामे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

"पंचनामे झाले नाही तर तक्रारी रद्द झाल्या असतील किंवा सरासरी सॅम्पल लागले असतील. हे बघून सांगावे लागेल." - वसीम शेख, जिल्हा समन्वयक, आयसीआयसीआय लोम्बार्ड.

"शेतात झालेल्या पीक नुकसानाची १ सप्टेंबरला तक्रार टाकली. अजूनपर्यंत शेतातील पंचनामे झाले नाहीत. माझ्यासारखे अजून २०० शेतकरी आहेत. जर दोन दिवसांत यावर काही तोडगा निघाला नाही तर आम्ही कंपनीविरोधात आंदोलन करू."- अभिलाष धांगे, शेतकरी 

"तुमच्या तक्रारी रद्द झाल्या असतील, असे सांगितले. परंतु डॉकेट आयडी आल्यावर तक्रारी रद्द कशा होतील आणि रद्द झाल्या तर शेतकऱ्यांना कळविले का नाही. ही कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. याकरिता कंपनीला याचे परिणाम भोगावे लागतील."- राहुल पेटकर, उपजिल्हाध्यक्ष, युवा संघर्ष मोर्चा

टॅग्स :wardha-acवर्धाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र