शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 49 अधिकारी अन् 1 हजार 500 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 05:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २३० ठिकाणाहून मिरवणुका काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शांतता कमेटी, मोहल्ला समिती व पोलीस पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व आयोजकांच्या पोलीस स्थानक स्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत. जयंती उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेण्याची गरज आहे. पोलीस ठाणे स्तरावर रूट मार्च काढण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कोरोना कमी झाल्याने निर्बंधही उठविण्यात आले आहे. आगामी सण, उत्सव धुमधडाक्यात साजरे करा. पण, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचणार नाही, याचीही काळजी घ्या. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना या उत्सवाला गालबोट लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २३० ठिकाणाहून मिरवणुका काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शांतता कमेटी, मोहल्ला समिती व पोलीस पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व आयोजकांच्या पोलीस स्थानक स्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत. जयंती उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेण्याची गरज आहे. पोलीस ठाणे स्तरावर रूट मार्च काढण्यात आले आहे. ध्वनीक्षेपकाबाबत नियमित डेसीबलचे उल्लंघन होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांची उपस्थिती होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व घडामोडींवर लक्ष राहणार आहे हे विशेष.

२५० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई आगामी सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने सुमारे २५० समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. 

मुख्य मार्गांवर ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’ -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी शहरासह जिल्ह्यातील मुख्य मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. -   इतकेच नव्हेतर खासगी कॅमेऱ्यांतूनही ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. प्रक्षोभक भाषणे, घोषणा तसेच सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. 

अन्य मार्गाने वाहतूक...शहरातील मिरवणुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीम वंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने येणार असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी झाँसी राणी चौक, गांधी चौक, बापूराव देशमुख चौक येथील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आलेली आहे. 

शिस्तप्रीय म्हणून सर्वत्र गांधी जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे सर्व सण, उत्सव साजरे करताना शिस्तीचे पालन करावे. गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यावी. कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, समाजकंटकांवर करडी नजर असून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.- प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा. 

 

टॅग्स :Policeपोलिस