शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

४,५८५ शेतकरी सोयाबीनच्या मदतीला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:35 IST

साधारणत: शेती कसणारा म्हणजे शेतकरी असे बोलले जाते. व्यवहारात हा प्रकार जरी वास्तविकेशी निगडीत असला तरी शासकीय मदतीचा लाभ घेताना हा प्रकार अडचणीचा ठरत असल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे.

ठळक मुद्देएक कोटी परत जाणार : विक्री पावती अन् सातबारावरील नावातील तफावतीमुळे गोंधळ

रूपेश खैरी।आॅनलाईन लोकमतवर्धा : साधारणत: शेती कसणारा म्हणजे शेतकरी असे बोलले जाते. व्यवहारात हा प्रकार जरी वास्तविकेशी निगडीत असला तरी शासकीय मदतीचा लाभ घेताना हा प्रकार अडचणीचा ठरत असल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकारामुळे सोयाबीनच्या क्ंिवटलमागे मिळणाºया २०० रुपयांच्या मदतीपासून जिल्ह्यातील तब्बल ४,५८५ शेतकरी वंचित राहणार असल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यातील एवढे सोयाबीन उत्पादक शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार असले तरी या मदतीपोटी जिल्ह्यात आलेल्या एकूण रकमेपैकी १ कोटी रुपये परत जाणार आहे. यामुळे शासनाची ही योजना खºया शेतकऱ्याकरिता कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले. हा घोळ कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीकरिता वापरलेल्या खºया नावाने पावती बनली आणि सातबारा मात्र दुसऱ्याच्याच नावाने असल्याने हा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतीत नुकसान सहन करणाºया शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.गत खरीपात सोयाबीन उत्पादकांना मिळालेल्या दरामुळे मोठा फटका बसला. यामुळे अशा शेतकऱ्याना दिलासा मिळावा म्हणून शासनाने बाजारात २५ क्विंटलपर्यंत सोयाबीन विक्री करणाऱ्यांना क्ंिवटलमागे २०० रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत शेतकºयांना मिळावी याकरिता बाजार समितीकडून याद्या घेत त्याची माहिती शासनाच्या पणन महामंडळाकडे पाठविले.शेतकऱ्यांच्या याद्या तयार करताना सातबारा आणि विक्री पावती यात असलेल्या नावात तफावत असल्याचे दिसून आले. यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने पणन मंत्रालयाला या संदर्भात मार्गदर्शन मागण्यात आले. यावर त्यांनी ज्यांच्या नावे सातबारा आहे, अशाच शेतकºयांना मदत देण्याच्या सूचना केल्या. यामुळे सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावे रक्कम येवूनही ती त्यांना न मिळता शासन जमा होण्याची वेळ आली आहे. शासनाने पावतींवर नाव असलेल्या शेतकऱ्यांना जर मदत दिली असती तर झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळाली असती अशा प्रतिक्रीया शेतकऱ्यांकडून मिळत असून याचा विचार होणे गरजेचे आहे.भाषेच्या गोंधळामुळे मदत जमा होण्यास विलंबशेतकºयांच्या याद्या पहिले मराठीत तयार करण्यात आल्या होत्या. या याद्या इंग्रजीतून पाठविण्याच्या सूचना बँकांकडून आल्याने याद्या पुन्हा करण्यात आल्या. यामुळे रक्कम येवूनही ती शेतकºयांच्या खात्यात जमा होण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात १९,४२६ शेतकऱ्यांकरिता आले होते ६ कोटीशासनाच्या सूचना येताच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने याद्या तयार करण्याचे काम करण्यात आले. प्रत्येक बाजार समितीतून पावत्या आणि शेतकºयांची नावे गोळा करून ती शासनाकडे पाठविली. वर्धा जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या १९ हजार ४२६ शेतकऱ्यांकरिता एकूण ६ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली. मात्र वाटप करताना शासनाकडून सातबाराची अट टाकण्यात आल्याने याचा लाभ १४ हजार ८४१ शेतकºयांनाच मिळणार असल्याचे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांकरिता ४ कोटी ५४ लाख ८ हजार ८३० रुपये बँकेत पाठविण्यात आले आहे.तीन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कमयाद्यांच्या भाषेचा घोळ आटोपल्यानंतर रक्कम खाते असलेल्या बँकेकडे पाठविण्यात आली. यात आतापर्यंत हिंगणघाट, समुद्रपूर आणि आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. इतर तालुक्यातील शेतकºयांच्या खात्यात मात्र ही रक्कम जमा झाली नाही. यामुळे उर्वरीत पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन मदतीच्या रकमेची प्रतीक्षा कामय आहे.शासनाच्या प्रथम सुचनेनुुसार बाजार समितीत पावत्यांवरील नावाची आणि विक्रीची यादी पाठविण्यात आली. यात पावतीत असलेले नाव आणि सातबारावर असलेल्या नावात तफावत असल्याने या संदर्भात काय करावे असे मार्गदर्शन शासनाला मागविण्यात आले. यावर शासनाने सातबारा महत्त्वाचा असे म्हणत मदत देण्याच्या सुचना केल्या. यानुसार बँकांत रकमा वळत्या करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा नव्हता अशा शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित रहावे लागले.- ए.बी. कडू, जिल्हा उपनिबंधक, वर्धा.