शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार ५०२ शेतकऱ्यांचे ४५.३८ कोटींचे कर्ज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

यावर्षी पीक कर्ज वाटपात नव्याने ४ हजार १४२ शेतकरी खातेदार जुळले असून त्यांना ३८.९९ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५ हजार ४६ पर्यंत वाढली आहे. त्यांना ५८.९४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत बँकेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या २११ असून यापैकी १७९ लाभार्थी शेतकऱ्यांना पावणेदोन कोटींची कर्जमाफी देण्यात आली.

ठळक मुद्दे३,९५० शेतकऱ्यांना ३०.१५ कोटींचे पीककर्ज : ४,१४२ नवे खातेदार

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र लाभार्थी शेतकºयांची संख्या ७ हजार ५७७ असून यापैकी ५ हजार ५०२ लाभार्थी शेतकऱ्यांना ४५.३८ कोटीची कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच योजनेत कर्जमाफी मिळालेल्या ५ हजार ५०२ शेतकऱ्यांपैकी ३ हजार ९५० शेतकऱ्यांना या हंगामाच्या ३० जुलैपर्यंत ३०.१५ कोटीचे पीककर्ज देण्यात आले आहे. तालुक्यातील १७ बँकापैकी १५ बँकांचे माध्यमातून पीक कर्जाचे वाटप केले जात आहे.तहसील कार्यालय व महाराष्ट्र बँक शाखेत आयोजित पीककर्ज वितरण पीक विमा तसेच महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी आढावा बैठकीत पालकमंत्री सुनील केदार यांना ही माहिती देण्यात आली. यावेळी खासदार रामदास तडस, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार राजेश सरवदे, महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रिया बागडे व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.यावर्षी पीक कर्ज वाटपात नव्याने ४ हजार १४२ शेतकरी खातेदार जुळले असून त्यांना ३८.९९ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५ हजार ४६ पर्यंत वाढली आहे. त्यांना ५८.९४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत बँकेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या २११ असून यापैकी १७९ लाभार्थी शेतकऱ्यांना पावणेदोन कोटींची कर्जमाफी देण्यात आली. कर्जमाफीतील या लाभार्थ्यांपैकी १०२ जणांना नव्याने ८३ लाखांचे पीककर्ज देण्यात आले. तसेच ९५ शेतकऱ्यांना ४८ लाखांचे नवीन पीक कर्जवाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी नवीन व महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेतील एकूण १९७ शेतकऱ्यांना १ कोटी ६८ लाख ७९ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती बँक प्रशासनाने पालकमंत्र्यांना दिली.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जSunil Kedarसुनील केदार