शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

समृद्धीत 38 आदिवासींची 42.99 हेक्टर जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या या ५८ किमीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी या महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील तब्बल ३८ आदिवासींची ४२.९९ हेक्टर जमीन घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे आदिवासींची जमीन अधिग्रहित करताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील ३४ गावांमधून हा महामार्ग गेला आहे. जिल्ह्यातून गेलेल्या या समृद्धी महामार्गाची लांबी ५८ किमी, तर रुंदी १२० मीटर आहे.

ठळक मुद्दे७८२ हेक्टर जमीन अधिग्रहिततीन तालुक्यातून गेलाय ५८ किमीचा महामार्ग

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महासमृद्धी महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यात एकूण ७८२ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या या ५८ किमीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी या महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील तब्बल ३८ आदिवासींची ४२.९९ हेक्टर जमीन घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे आदिवासींची जमीन अधिग्रहित करताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील ३४ गावांमधून हा महामार्ग गेला आहे. जिल्ह्यातून गेलेल्या या समृद्धी महामार्गाची लांबी ५८ किमी, तर रुंदी १२० मीटर आहे. सहा पदरी असलेल्या या महामार्गावर पाच मोठ्या आणि २७ लहान पुलांसह विनाअडथळा वाहतूक होण्यासाठी नऊ उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत. शिवाय ३४ भुयारी मार्ग निर्माण करण्यात आलेत. पादचाऱ्यांकरिता १२ भुयारी मार्गांचा समावेश आहे. येळाकेळी व विरूळ येथे इंटरचेंजेसही देण्यात आले आहेत. महामार्गाच्या वाहनांमुळे वन्यप्राणी विचलित होऊ नये, यासाठी दोन ठिकाणी उन्नत मार्ग राहणार आहेत. एकूणच या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास अतिजलदगतीने तसेच अवघ्या काही तासांतच पूर्ण होणार आहे. त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांसह नागरिकांना होणार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

तीन तालुक्यांतून गेलाय समृद्धी महामार्ग-    हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महासमृद्धी महामार्ग हा वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातून गेलेला आहे. वर्धा तालुक्यातील महाकाळ, पिपरी, पांढरकवडा, गणेशपूर, दिग्रस, झाडगाव, वाठोडा, धामणगाव, डोरली, लोणसावळी तर सेलू तालुक्यातील सेलडोह, खडकी (आ.), धोंडगाव, आमगाव (ख.), केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मे.), मोहनापूर, कान्हापूर, गोंदापूर, सुरगाव, वानोडा, केळी, खडकी (बे.) तसेच आर्वी तालुक्यातील बोरी, मानकापूर, रेणकापूर, हुसेनपूर, विरूळ, सावरखेड, निजामपूर, पिंपळगाव या गावांतून हा महामार्ग गेला आहे. वर्धा जिल्ह्यात महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

महामार्ग सहापदरी -   वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाची लांबी ५८ किमी तसेच रुंदी १२० मीटर असून तो दोन-चार नव्हे तर तब्बल सहापदरी आहे. त्यासाठी २ हजार ७६२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

समृद्धी मुंबई-नागपूर या महानगरांना जोडणारा-    वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील एकूण ७८२ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आलेला हा महामार्ग राज्याची राजधानी असलेल्या मुंबई आणि उपराजधानी असलेल्या नागपूर या महानगरांना जोडणारा आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग