शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

सीमाबंदीमुळे खासगी कंपन्यांतील ४ हजार कर्मचारी लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

वर्ध्यातून दररोज नागपूर, अमरावती व चंद्रपूर या मार्गावर जवळपास ४ हजार नोकरदार प्रवास करतात. त्यापैकी ८० टक्के कर्मचारी हे खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रकोप वाढताच सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांच्या प्रवासाला ब्रेक लागला. ३१ मेपर्यंत सर्व खासगी कंपन्या, उद्योग बंद करण्याच्या करण्यात आले आणि घरूनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देबेरोजगारीची टांगती तलवार : प्रवास परवानगीकरिता प्रशासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ च्या संसर्गामुळे राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व कंपन्या व उद्योग बंद ठेवण्यात आले. आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने शिथिलता दिल्याने विविध कंपन्या व उद्योग सुरू झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रुजू होण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थानाकडून करण्यात आल्या. मात्र, सीमाबंदी असल्याने लगतच्या जिल्ह्यांमध्ये काम करणारे खासगी कंपन्यांचे ४ हजार कर्मचारी वर्ध्यातच लॉकडाऊन झाले आहेत. ते कर्तव्यावर रुजू झाले नाही तर त्यांची नोकरी जाण्याची वेळ आली असून त्यांनी प्रवास परवानगीकरिता जिल्हा प्रशासनाला साकडे घातले आहे.वर्ध्यातून दररोज नागपूर, अमरावती व चंद्रपूर या मार्गावर जवळपास ४ हजार नोकरदार प्रवास करतात. त्यापैकी ८० टक्के कर्मचारी हे खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रकोप वाढताच सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांच्या प्रवासाला ब्रेक लागला. ३१ मेपर्यंत सर्व खासगी कंपन्या, उद्योग बंद करण्याच्या करण्यात आले आणि घरूनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नुकताच केंद्र सरकारने चौथ्या लॉकडाऊनमध्ये सूट दिल्याने कंपन्याही सुरू करण्यात आल्या आहे. कंपनी व्यवस्थापनाने सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून कामावर रुजू होण्यास कळविले आहे.मात्र, वर्ध्यातून नागपूर, अमरावती व चंद्रपूर या जिल्ह्यात जाण्या-येण्याकरिता परवानगी मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. कंपन्यांचे या लॉकडाऊनच्या काळात नुकसान झाल्याने कर्मचाऱ्यांना २५ ते ३० टक्के कपात करून वेतन दिले जात आहे.अशातच आता कर्मचारी कामावर रुजू होऊ शकले नाही तर त्यांना कामावरून कमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कामाच्या ठिकाणी ये-जा करण्याकरिता परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वैदर्भीय रेल्वे एमएसटी प्रवासी संघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.नोकरी गेल्यास परिवार उघड्यावरअमरावती, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रवास करण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. पण, अद्याप परवानगी मिळाली नसल्याने नोकरी जाण्याची दाट शक्यता आहे. नोकरी गेल्यास कुटुंबीय उघड्यावर येण्याची भीती कर्मचाऱ्यांच्या मनात घर करीत असल्याने याचा परिणाम अनेकांच्या प्रकृतीवरही होत असल्याचे पत्रात म्हटले आहे.जिल्हा प्रशासनाकडून जाण्यास परवानगी मिळाल्यास १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याने, ही अट आणखीच अडचणीची ठरत आहे. आधीच नुकसानीचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेरोजगार होण्यापासून रोखण्यासाठी तत्काळ तोडगा काढण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.वर्ध्यातून दररोज अमरावती, नागपूर व चंद्रपूर या ठिकाणी अपडाऊन करणाऱ्यांची संख्या ४ हजारांच्या घरात आहे. त्यापैकी बहुतांश कर्मचारी हे खासगी क्षेत्रात काम करणारे आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच वेतन कपातीचा सामना करावा लागला. आता कंपन्यांनी रुजू होण्यास सांगितले आहे. मात्र सीमाबंदीमुळे ये-जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. सोबतच १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागणार असल्याने अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर तत्काळ तोडगा काढावा.एस.दुरतकर, कर्मचारी, खासगी क्षेत्र

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या