शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयात ३५.२० टक्केच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:14 IST

यंदाच्या वर्षी पाहिजे तसा मुसळधार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे वास्तव आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये केवळ ३५.२० टक्केच जलसाठा असून केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे.

ठळक मुद्दे१० प्रकल्प तहानलेलेच : पोथरा प्रकल्प झाला फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी पाहिजे तसा मुसळधार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे वास्तव आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये केवळ ३५.२० टक्केच जलसाठा असून केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे. येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना जलसंकटाला सामोरे जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने अनेकांच्या अडचणीत भर पडली होती. त्यातच शेतकऱ्यांच्या पेरण्याही खोळंबल्या होत्या. परंतु, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला. याच कालावधीत जिल्ह्यातील पोथरा हा प्रकल्प १०० टक्के भरला. परंतु, जिल्ह्यातील इतर दहा प्रकल्पांच्या पाणी पातळीत नाममात्र वाढ झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा जुलैच्या चौथ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत असले तरी येत्या काही दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.गतवर्षी होता २५.४९ टक्के जलसाठागत वर्षी जिल्ह्यातील ११ प्रकल्पात जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत २५.४९ टक्केच जलसाठा होता. यंदाच्या वर्षी जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील ११ प्रकल्पात सरासरी ३५.२० इतका जलसाठा असल्याचे सांगण्यात येते. गत वर्षीच्या तुलनेत सुमारे १० टक्के जलसाठा सध्या जलाशयांमध्ये जादा असला तरी अनेकांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षाच आहे.गत वर्षी पावसाळ्याच्या अखेरीस भरले जलाशयगत वर्षी सुरूवातीला पावसाने हुलकावणीच दिली. त्यामुळे जलसंकटाला सामोरे जावे लागेलच असा विश्वास अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत होते. मात्र, पावसाळ्याच्या अखेरीस वर्धा जिल्ह्यावर वरुणराजा मेहरबानच झाला. त्यामुळे त्यावेळी जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली होती. यंदाही पावसाळ्याच्या अखेरीसच वरुणराजा जिल्ह्यावर मेहरबान होत जलाशय फुल्ल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस