चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहतुकीच्या नियमांना बगल देत बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने कारवाई केली जाते. मागील ११ महिन्यात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने ३४ हजार १०० वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७१ लाख ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत बेशिस्तपणे वाहनचालविणे हे कायद्या नुसार गुन्हा आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. इतकेच नव्हे तर वाहनतळ निर्माण करण्यासाठी न.प.चे दुर्लक्ष होत असल्याने मुख्य बाजारपेठेतील अनेक परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. वाहनचालविताना इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे करणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न वापरणे, वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविणे आदी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्याने सदर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखेने यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत ३४,१०० वाहनांवर कारवाई केली.११ महिन्यांतील कारवाईची स्थितीहेल्मेटचा वापर न करणाऱ्या ८०, सीटबेल्टचा वापर न करणाºया १०७४, भरधाव वाहन चालविणाºया १३, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाºया ३३४, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाºया ४५, विना परवाना वाहन चालविणाºया ५७०, विना इन्शुरन्स वाहन चालविणाºया ५८, वयोमर्यादा पूर्ण नसतानाही वाहन चालविणाºया १००, विरूद्ध दिशेने वाहन चालविणाºया ४८७, फॅन्सी नंबरप्लेटचा वापर करणाºया २९, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाºया ४१, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणाºया ६०५० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर चारचाकीला डार्क फ्लिम लावणाºया ६२, कर्णकर्कश हॉर्न लावणाºया ३८, ट्रिपलसिट दुचाकी चालविणाºया २७२४, वन-वे मध्ये वाहन नेणाºया २१८, वाहतुकीस अडथळा करणाºया १,२८८, अवैध प्रवासी वाहतूक करणाºया ४३८ तर वाहतूक नियमाच्या विविध कलमांना पाठ दाखविणाºया २० हजार ४४२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.हेल्मेटसक्तीची होतेय अंमलबजावणीदुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शिवाय सीटबेल्टचा वापर न करणाºयांवर दंड ठोठावला जात आहे. हेल्मेटचा वापर न करणाºया ८० तर सिटबेल्टचा वापर न करणाºया १ हजार ७४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
३४ हजार १०० वाहनचालकांकडून ७१.५० लाखांची दंडवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत बेशिस्तपणे वाहनचालविणे हे कायद्या नुसार गुन्हा आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. इतकेच नव्हे तर वाहनतळ निर्माण करण्यासाठी न.प.चे दुर्लक्ष होत असल्याने मुख्य बाजारपेठेतील अनेक परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते.
३४ हजार १०० वाहनचालकांकडून ७१.५० लाखांची दंडवसुली
ठळक मुद्देवाहतूक नियंत्रणशाखेची कामगिरी : बेशिस्त वाहनचालकांच्या आवळल्या मुसक्या