शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

३,२७० नमुन्यांची झाली तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:59 IST

जिल्ह्यातील विविध भागात सध्या विकास कामे झटपट पूर्ण करण्याचा सपाटा सुरू आहे. ही विकास कामे गुणवत्तापूर्ण व्हावी अशा मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून होत असलेल्या बांधकामादरम्यान विविध प्रकारचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्धा येथील क्षेत्रिय गुणनियंत्रण प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात.

ठळक मुद्देसा.बां.वि.च्या जिल्हा क्षेत्रीय गुणनियंत्रण प्रयोगशाळेचे अकरा महिन्यातील कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील विविध भागात सध्या विकास कामे झटपट पूर्ण करण्याचा सपाटा सुरू आहे. ही विकास कामे गुणवत्तापूर्ण व्हावी अशा मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून होत असलेल्या बांधकामादरम्यान विविध प्रकारचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्धा येथील क्षेत्रिय गुणनियंत्रण प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. मागील ११ महिन्यात तब्बल ३ हजार २७० नमुन्यांचे परिक्षण या प्रयोगशाळेत करून त्याबाबतचा चाचणी अहवाल निर्गमित करण्यात आला आहे.जिल्हा क्षेत्रिय गुणनियंत्रक प्रयोगशाळा सा.बां.वि. उपविभाग क्र. १ वर्धा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी अंतर्गत कार्यरत उपविभागामार्फत आॅनलाईन सादर करण्यात आलेल्या पत्राद्वारे आवश्यक चाचणी साहित्य प्रयोगशाळेत प्राप्त होतात. यात गिट्टी, मुरुम, विटा, रेती, सिमेंट तसेच डांबर आणि कॉक्रीट क्युब आदी नमुन्याचे परिक्षण करून चाचणी अहवाल सादर करण्यात येतात. जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत संबंधित विभागांकडून प्रयोगशाळेत एकूण ३ हजार २७० नमुने सादर केले. त्याचे परिक्षण करून चाचणी अहवाल निर्गमित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात मानकाप्रमाणे आवश्यक साहित्य आढळून आले आहे.४९.२ लाखांची केली कमाईसदर साहित्य चाचणी करण्यासाठी संबंधितांकडून शासकीय नियमाप्रमाणे आॅनलाईन शुल्क आकारण्यात येते. जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सा.बां.वि.च्या जिल्हा क्षेत्रिय गुणनियंत्रक प्रयोगशाळेला ४९ लाख २ हजार ५०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.अल्प मनुष्यबळावर ओढला जातोय गाडासध्या सा.बां.वि.च्या जिल्हा क्षेत्रिय गुणनियंत्रक प्रयोगशाळेत शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच काही कर्मचारी कार्यरत आहेत. असे असले तरी महत्त्वाचे असलेले लॅब असीस्टंट व इतर काही पद रिक्त आहेत. अल्प मनुष्यबळाच्या जोरावर सध्या या प्रयोगशाळेतील कामकाजाचा गाढा ओढला जात असल्याचे वास्तव आहे. तेथील कामकाम सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शाखा अभियंता संजय मिसाळ व कनिष्ठ अभियंता किशोर काळबांडे व त्यांचे सहकारी सांभाळत आहेत.मानकाप्रमाणे आढळले साहित्यजानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत संबंधित विभागांकडून जिल्हा क्षेत्रिय गुणनियंत्रक प्रयोगशाळेला एकूण ३ हजार २७० नमुने प्राप्त झाले. त्याची तपासणीही करण्यात आली असून त्यात मानकाप्रमाणे साहित्य आढळून आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Healthआरोग्य