शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

३२१ किमीचे राज्य मार्ग, ७२६ किमीचे प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

दर्जोन्नत झालेले हिंगणघाट तालुक्यातील १६८ किमीचे सहा प्रमुख जिल्हा मार्ग नव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यात आले आहेत, तर देवळी तालुक्यातील २० किमीचा एक प्रमुख जिल्हा मार्ग दर्जोन्नत झाल्याने जि. प.च्या बांधकाम विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आठपैकी पाच तालुक्यांतील तब्बल ३२१ किमीचे राज्य मार्ग तसेच ७२३ किमीचे प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमय असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आले आहे. याच मार्गांवरील जीवघेणे खड्डे बुजविण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरुवात करण्यात आली असली, तरी उसंत घेत सुरू असलेला पाऊस खड्डे बुजविण्याच्या कामात व्यत्यय आणत असल्याचे वास्तव आहे.दर्जोन्नत झालेले हिंगणघाट तालुक्यातील १६८ किमीचे सहा प्रमुख जिल्हा मार्ग नव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यात आले आहेत, तर देवळी तालुक्यातील २० किमीचा एक प्रमुख जिल्हा मार्ग दर्जोन्नत झाल्याने जि. प.च्या बांधकाम विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला आहे. सध्य:स्थितीत देवळी तालुक्यातील ४२ टक्के राज्य मार्ग, तर ६३ टक्के प्रमुख जिल्हा मार्गांवरील खड्डे, हिंगणघाट तालुक्यातील ६८ टक्के राज्य मार्ग, तर ५३ टक्के प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे, समुद्रपूर तालुक्यातील ६९ टक्के राज्य मार्ग, तर ४८ टक्के प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे सेलू तालुक्यातील ५२ टक्के राज्य मार्ग, तर ५२ टक्के प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे तसेच वर्धा तालुक्यातील राज्य मार्गावरील ६९ टक्के, तर प्रमुख जिल्हा मार्गावरील ७२ टक्के खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजविण्यात आले आहे. पण, पावसामुळे पुन्हा नवीन खड्डे तयार होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खड्डे बुजविण्याची टक्केवारी कमी होत आहे.

पावसाने विश्रांती घेताच दिली जाणार गती- जिल्ह्यातील राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग गुळगुळीत व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे; पण सध्या उसंत घेत सुरू असलेल्या पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अडचणीत भर टाकली आहे. असे असले तरी पावसाने विश्रांती घेताच जीवघेणे खड्डे बुजविण्याच्या कामाला गती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.- जिल्हा परिषद प्रशासनाकडून तब्बल सात दर्जोन्नत दस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते झाल्याने यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाट्याला खड्डेमय रस्ते जास्त आले आहेत. पण तेही लवकर गुळगुळीत करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. 

 

टॅग्स :highwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षा