शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

सौर कृषिपंपातून ३०० दिवस पाणी

By admin | Updated: October 16, 2015 02:52 IST

पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाच एकरापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.....

आशुतोष सलील : तब्बल २० वर्षे वीज देयक भरण्यापासून सुटकावर्धा: पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाच एकरापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९२० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या पंपामुळे शेतकरी वर्षातील ३०० दिवस ओलित करू शकेल. यामुळे सौर कृषीपंप जोडण्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील म्हणाले.घोराड येथे देवराव तडस यांच्या शेतात सौर कृषिपंपाच्या प्रात्यक्षिकाची पाहणी जिल्हाधिकारी सलील यांनी गुरुवारी केली. सौर उर्जेद्वारा तीन अश्वशक्ती तसेच ५ व ७.५ अश्वशक्ती सौरपंपाद्वारा शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. शेतकऱ्यांना सौर उर्जेवर कृषी पंपाची प्रत्यक्ष पाहणी करता यावी याकरिता या प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. सौर कृषीपंप योजना ही आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये केंद्र व राज्य शासनाचे अनुदान असून लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के मिळवून सौर कृषीपंप महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. धडक सिंचनचे लाभार्थी, अतिदुर्गम भागातील शेतकरी तसेच ज्या गावात विद्युतीकरण झाले नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्याने लाभ मिळणार आहे.सौर कृषीपंप योजनेचे प्रात्यक्षिक घोराड तसेच समुद्रपूर येथे आयोजित करण्यात आले असून या योजनेंतर्गत तीन अश्वशक्ती पंपासाठी २५० अश्वशक्तीची १२ पॅनेल तसेच पाच अश्वशक्तीसाठी २० पॅनेल राहणार आहेत. ३६५ दिवसांपैकी सौरउर्जेद्वारे ३०० दिवस दररोज आठ तास कृषीपंपाद्वारे शेतकऱ्यांना ओलिताची सुविधा उपलब्ध होणार आहे. सौरपंपाची कालमर्यादा २० ते २५ वर्षे असल्यामुळे २० वर्ष वीज देयक भरण्याची आवश्यकता राहणार नाही. तीन अश्व शक्तीसाठी शेतकऱ्यांना १६ हजार २०० रुपये सहभाग भरल्यास ३ लक्ष २४ हजार रुपयांचा ३ अश्वशक्तीचा सोलार पंप उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. प्रारंभी वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता एस.ए. कांबळे यांनी त्यांचे सौर उर्जा प्रात्यक्षिकाबद्दल माहिती दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, कार्यकारी अभियंता व प्रकल्प समन्वयक विजयकुमार उगले, तहसीलदार होळी, तालुका कृषी अधिकारी आर.एस. जावंधिया, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता पुरी, जतीन पटेल, पंकज वाढण, अमित वागडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)आठवड्यातून चार दिवस दिवसाला आठ तर ३ दिवस रात्रीला १० तास थ्रिफेज पुरवठा शेतकऱ्यांना ओलिताकरिता एमईआरसीच्या नियमानुसार आठवड्यातून चार दिवस दिवसाला आठ तास तर तीन दिवस रात्रीला १० तास थ्रिफेज विद्यूत पुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून कुठल्याही सूचना अल्याशिवाय बदल करता येत नसल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शंकर कांबळे यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांकरिता सौर कृषी पंप योजना लाभाची ठरणार आहे. यात शेतकरी त्याच्या गरजेनुसार त्याचा उपययोग करू शकतो.