लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी कोरोनाच्या ३० रुग्णाची नोंद गुरुवारी घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आकडा ३४७ वर पोहचला आहे. गुरुवारी आर्वी येथे ४ तर रोहणा येथे १, जाम, हिंगणघाट येथे १ व गिमा टेक्सटाईल्स छोटी वणी येथे १ याशिवाय सगुणा कंपनीत १४ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. समुद्रपूर तालुक्यातही ४ रुग्णांची नोंद घेण्यात आली. यात हळदगाव येथील एका इसमाचा समावेश आहे. पुलगावच्या जाकिर हुसेन कॉलनीत १ व देवळी येथे २ तर सारवाडी येथे एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात सध्या अ?ॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या ८२ झाली असून आतापर्यंत २५६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.
वर्धा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ३० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 20:42 IST