शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

लॉकडाऊन काळात ३७ दिवसात तब्बल २६६ विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST

तीन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर काही प्रमाणात व्यवहार आणि जनजीवन पूर्वपदावर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभ मोजक्याच उपस्थितीत साजरा करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले. तहसीलदारांना नागरिकांचे विवाह सोहळ्यास परवानगी देण्याचे अधिकार मिळाले. सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी, तसेच जमावबंदीच्या नियमाचे पालन करण्याचे अधीन राहत अटी, शर्ती घालून लग्नसमारंभांना परवानगी देण्यात आली.

ठळक मुद्देआर्वी तालुक्यात वर-वधू पित्यांकडून थाटमाटाला छेद : समारंभावर होणारा लाखो रुपयांचा अनाठायी खर्च वाचला

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एन हंगामात लॉकडाऊन होते. दरम्यानच्या ३७ दिवसांच्या काळात कुठलाही थाटमाट न करता तब्बल २६६ विवाह पार पडले. यामुळे लग्नसमारंभांवर होणारा लाखो रुपयांचा चुराडा वाचला.मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने लग्नसराईचे. मात्र या महिन्यातील सर्व विवाहच लॉकडाउन काळात लॉक झाले. मंगल कार्यालय, बँड बाजा, वराती, घोडा गाडी, आचारी, भोजन, दुकाने, ब्युटीपार्लर आदींवर बंदी घालण्यात आली. सर्वच ठप्प झाले. या लॉकडाऊनची गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच झळ बसली.तीन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर काही प्रमाणात व्यवहार आणि जनजीवन पूर्वपदावर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभ मोजक्याच उपस्थितीत साजरा करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले. तहसीलदारांना नागरिकांचे विवाह सोहळ्यास परवानगी देण्याचे अधिकार मिळाले. सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी, तसेच जमावबंदीच्या नियमाचे पालन करण्याचे अधीन राहत अटी, शर्ती घालून लग्नसमारंभांना परवानगी देण्यात आली. तालुक्यात पहिली परवानगी टाकळी निजामपूर येथील विवाह सोहळ्यास देण्यात आली होती. तेव्हापासून तर आतापावेतो परवानगीनंतर ३७ दिवसात तब्बल २६६ विवाहसोहळे पार पडले. आजघडीला एका विवाह सोहळ्यास कमीतकमी साधारण ३ ते ५ लाखांचा खर्च येतो. कोरोनाने विवाह सोहळ्यांवर होणारा हा अनाठायी वाचला. तहसीलदार विद्यासागर चव्हाण, नायब तहसीलदार दीपक काळुसे, श्रीधर मोहोड, सुभानखाँ पठाण यांच्या पथकाने या विवाह सोहळ्याची सर्व कागदपत्रे तपासून परवानगी दिली. महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत काहीही अडचण न येता व्यवस्थितपणे सोशल डिस्टन्सिंग आणि शासनाच्या निर्देशांचे पालन करून २६६ विवाह पार पडले.

टॅग्स :marriageलग्न