शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

साधारण गुन्ह्यांतील २६ बंदीवानांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. देशातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कोरोना विषाणूने आता राज्यातही आपले पाय हळू हळू पसरले आहे. कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत असताना कारागृहात असलेल्या बंदीवानांचाही विचार शासनाने केलेला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा धसका । २५२ बंदींच्या प्रस्तावाला न्यायालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या देशात कोरोना विषाणूने कहर केला असून या महामारीला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. गृहविभागाच्या आदेशानुसार तसे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात असलेल्या साधारण बंदीवानांना सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जे बंदीवान साधारण गुन्ह्यांच्या स्वरुपात कारागृहात होते अशा २६ बंदीवानांना शुक्रवारी कारागृहातून सोडण्यात आले.संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. देशातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कोरोना विषाणूने आता राज्यातही आपले पाय हळू हळू पसरले आहे. कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत असताना कारागृहात असलेल्या बंदीवानांचाही विचार शासनाने केलेला आहे.जे बंदीवान साधारण गुन्ह्यात कारागृहात आलेले आहे अशांना सोडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्याअनुषंगाने वर्धा जिल्हा कारागृहात बंदीवानांची गर्दी वाढू नये, यासाठी साधारण गुन्ह्यांच्या स्वरुपात अडकलेल्या २६ बंदीवानांना शुक्रवारी सोडण्यात आले आहे.वर्धा जिल्हा कारागृहात २५२ बंदीवानांची क्षमता आहे. सध्या कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे ३५२ बंदीवान आहेत.सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा लागणाऱ्या कलमांन्वये तसेच साधारण स्वरुपाच्या गुन्ह्यातील तब्बल २६ बंदीवानांना कारागृहातून सोडण्यात आले आहे. तर २७० बंदीवानांना कारागृहातून मुक्त करण्यासाठी विनंती अर्ज संबंधीत न्यायालयाकडे पाठविण्यात आले आहे. न्ययालयाकडून त्यांचा विचार झाल्यावरच त्या बंदीवानांना देखील सोडण्यात येणार आहे.कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच बंदीवानांची तपासणीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहात आणल्या जाणाऱ्या बंदीवानांची कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जर एखाद्या बंदीवानाला सर्दी, खोकला झाल्याचे निदर्शनास येताच त्यांना रुग्णालयात दाखल केल्या जात आहे.हिंगणघाट न्यायालयाने सोडले सहा बंदीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यायालयीन कामकाज देखील बंद ठेवण्यात आले आहे. पण, न्यायालयातील एक कोर्टाचे कामकाज मात्र, सुरू आहे. जिल्हा कारागृह प्रशासनाने २७० बंदीवानांना सोडण्याचे विनंती अर्ज संबंधित न्यायालयात दाखल केले होते. त्यापैकी २६ बंदीवानांना सोडण्यात आले. यामध्ये हिंगणघाट न्यायालयाने ६ बंदीवानांची सुटका केली.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साधारण स्वरुपातील असलेल्या तसेच सात वर्षे शिक्षेच्या आतील येत असलेल्या बंदीवानांना मुक्त करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार आतापर्यंत २६ बंदीवानांना कारागृहातून सोडण्यात आले आहे तर २५२ बंदीवानांचे विनंतीअर्ज संबंधित न्यायालयाकडे पाठविण्यात आले आहे. संबंधित न्यायालय याबाबतचा विचार करणार आहे.सुहास पवार, कारागृह अधीक्षक, जिल्हा कारागृह, वर्धा.

टॅग्स :jailतुरुंग