शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

वर्ध्यातील आष्टी तालुक्यात २६ बोगस डॉक्टर ! मुळव्याधीच्या शस्त्रक्रिया अयशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:51 IST

Wardha : बनावट पदव्या आणि डिप्लोमांचा आधार घेत आष्टी तालुक्यात बोगस डॉक्टर करतात 'प्रॅक्टिस'

अमोल सोटे लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : रुग्णसेवा हीच देशसेवा असे बिरुद मिरवणाऱ्या आरोग्य विभागाची सेवा चांगलीच ढेपाळली आहे. त्याचाच फायदा सध्या बोगस डॉक्टरांनी उचलला आहे. या बोगस डॉक्टरांनी आष्टी तालुक्यात चांगलाच कहर केला आहे. बनावट पदव्या आणि डिप्लोमांचा आधार घेत आष्टी तालुक्यात तब्बल २६ बोगस डॉक्टर विविध गावांमध्ये 'प्रॅक्टिस'च्या नावाखाली कार्यरत आहेत.

या डॉक्टरांना कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय ज्ञान नसल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी जीवघेणा खेळ चालविला असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र आरोग्य विभाग निद्रावस्थेत असल्यामुळे त्यांच्यावर कुणीही वचक ठेवायला तयार नाही. त्यामुळे आरोग्य विभाग आणि बोगस डॉक्टर यांचे साटेलोटे असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकांनी केला आहे. अंग अंगदुखी, हातपाय दुखणे शरीरातील विविध असलेल्या व्याधी, मूळव्याध, भगंदर, मांस पेशीच्या गाठी याचे ऑपरेशन सुद्धा हे बोगस डॉक्टर करीत आहे. मात्र अनेक लोकांच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना उच्च पातळीच्या डोजेसचा वापर करून शरीरातील मजबूत अवयव लूज करण्याचा प्रकार सर्रास चालविला आहे. 

मुळव्याधीच्या १८ शस्त्रक्रिया अयशस्वी२६ बोगस डॉक्टरपैकी ८ डॉक्टर मुळव्याधी, भगंदरचे ऑपरेशन करतात. मुळव्याधीची शस्त्रक्रिया करण्याच्या ठिकाणी भूल देतात. मात्र त्यांनी आतापर्यंत वर्षभरामध्ये शंभरावर शस्त्रक्रिया केल्या असून त्यापैकी १८ रुग्णांच्या शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यात. त्यामुळे या बोगस डॉक्टरांच्या हातून आपले ऑपरेशन यशस्वी झाले नसून त्यांनी खासगी डॉक्टरांकडे जाऊन पुन्हा ऑपरेशन करून घेतले. अशा डॉक्टरांवर तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल करावे आणि त्यांना आष्टी तालुक्यातून हद्दपार करण्याची मागणी आहे.

या गावात सुळसुळाट...आष्टी तालुक्यात साहूर, माणिकवाडा, तारासावंगा, बोरगाव, वडाळा, भारसवाडा, लहानआर्वी, अंतोरा, थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी, आबाद किन्ही, मोई, खडकी, पांढुर्णा, पोरगव्हाण, पंचाळा तर तालुक्याच्या शेजारी असणाऱ्या कारंजा तालुक्यातील सारवाडी, जसापूर, किन्हाळा, पारडी, बोटोना, माळेगाव, झाडगाव या गावांमध्ये चांगलाच कहर आहे.

"आष्टी तालुक्यामध्ये बोगस डॉक्टर तपासणीची मोहीम सुरू होती. तीन बोगस डॉक्टर आढळले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असून प्रकरण न्यायालयात आहे. उर्वरित बोगस डॉक्टरांच्या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी तक्रारी करायला पाहिजे. त्यानुसार तत्काळ कारवाई करण्यात येईल."- डॉ.एस.एम कासारे, तालुका आरोग्य अधिकारी,

टॅग्स :wardha-acवर्धा