शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

वाळूचोरट्यांनी पोखरले अडीच किलोमीटरचे नदीपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:04 IST

देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे यशोदा आणि भदाडी नदीचा संगम असून मोठ्या प्रमाणात वाळूसाठा होता. या वाळूसाठ्यावर वायगाव (निपाणी) येथील वाळूचोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी तब्बल अडीच किलोमीटरचे पदीपात्र पोखरले आहे. त्यामुळे लगतच्या गावकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवायगावच्या चोरट्यांचा धुडगूस : यशोदा नदीपात्रात दिवस-रात्र होतोय उपसा, प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे यशोदा आणि भदाडी नदीचा संगम असून मोठ्या प्रमाणात वाळूसाठा होता. या वाळूसाठ्यावर वायगाव (निपाणी) येथील वाळूचोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी तब्बल अडीच किलोमीटरचे पदीपात्र पोखरले आहे. त्यामुळे लगतच्या गावकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी होत आहे.वाळूघाट बंदी असल्याने वाळू चोरट्यांनी गावातील नदी, नाल्यांवर आपला मोर्चा वळविला आहे. याचा फटका सोनेगाव (बाई) येथील नदी, नाल्यांनाही बसला आहे. सोनेगाव येथे यशोदा व भदाडी नदीचा संगम होऊन ती पुढे टाकळी (चणा) व सरुळकडे वाहत जाते. या नदीपात्रात वाळूसाठा असल्याने वायगाव (निपाणी) येथील वाळू चोरट्यांनी या नदीपात्रात दिवस-रात्र उपसा सुरू केला आहे. पहाटेपासूनच ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू चोरी होत आहे. बघता-बघता या चोरट्यांनी सोनेगा ते टाकळीपर्यंत जवळपास अडीच की.मी.चे नदीपात्र पोखरुन टाकले आहे. नदीपात्राच्या अड्यालपड्याल शेती असल्याने पावसाळ्यात शेतकरी याच नदीतून ये-जा करतात. आता नदीपात्रात मोठे खड्डे पडल्याने धोका निर्माण झाला आहे. या चोरट्यांनी वाळू उपसा करुन वायगाव आणि वडद परिसरात साठवणूक करून ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत साठविलेली वाळू जप्त करण्याची मागणी होत आहे.पोलिसांच्या आशीर्वादाने वाळूचोरटे सैराटया परिसरात महसूल विभागापेक्षा पोलीस विभागतच वाळूचोरट्यांवर नजर ठेवून असतात. रात्रीच्यावेळी वायगाव रस्त्यावर वाळूची वाहने अडविण्याचे काम पोलीसच करताना दिसत आहे. या वाळूच्या वाहनचालकांकडून हप्त्याची रक्कमही वसूल करीत असल्याची ओरड होत आहे. विशषेत: वायगावातील वाळू चोरटेच पोलिसांचे मध्यस्थ असल्याने सोनेगावातून बेदरकारपणे वाळूउपसा करीत आहे. पोलीस व महसूल विभाग खिशात असल्याचे सांगून आम्हीच आमच्या मर्जीचे राजे, अशा आविर्भावात वागून नदीपात्राची वाट लावत आहेत. त्यामुळे आता पोलीस विभाग व महसूल विभाग वाळूचोरांवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.युवकाला धक्काबुक्की केल्याची पोलिसांत तक्रारनदीपात्रातून अवैध वाळूउपसा करणाऱ्यांना हटक ले तर ते अंगावर चाल करून येतात. त्यांना पोलिसांचा वरदहस्त असल्याने तेही निर्ढावलेले आहेत. वाळूचोरीची माहिती अधिकाऱ्यांना देत असल्याच्या कारणावरून वायगावातील तिघांनी सोनेगावच्या विजय फुके नामक युवकाला धक्काबुक्की केली. या प्रकरणी युवकाने वाटगुळे, झाडपे व आणखी एकाविरुद्ध देवळी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.

टॅग्स :sandवाळू