शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 23:59 IST

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही शिकवण विविधतेत एकता असलेली भारतीय संस्कृती प्रत्येकाला शिकवते. परंतु काही जण याच वन संपदेचे नुकसान करीत वन्य प्राण्यांच्या शिकारीही करीत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देअवैध वृक्ष कत्तलीसह शिकारीला आळा : पेट्रोलिंग व्हॅन ठरल्या फायद्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही शिकवण विविधतेत एकता असलेली भारतीय संस्कृती प्रत्येकाला शिकवते. परंतु काही जण याच वन संपदेचे नुकसान करीत वन्य प्राण्यांच्या शिकारीही करीत असल्याचे वास्तव आहे. वन्य प्राण्याची शिकार करणाऱ्यांना धडा शिकविण्यासह वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी सध्या स्थानिक वन विभागाने कंबर कसली आहे. शिवाय वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्याची नोंद वन विभागाने घेतली आहे.जिल्ह्यात वर्धा, समुद्रपूर, हिंगणी, कारंजा (घा.), तळेगाव, आष्टी, आर्वी व खरांगणा हे वन परिक्षेत्र आहेत. याच परिसरात अवैध वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार, वन जमिनीवर अतिक्रमण, वन जमिनीवर होणारे अवैध उत्खनन, प्रतिबंधित क्षेत्रात चराई, वन वनवा आदींना आळा घालण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून सध्या विशेष प्रयत्न केले जात आहेत. वरिष्ठांच्या सुचनेवरून प्रतिबंधात्मक ठरणारे काम करताना काही चूकीचे होत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्यांची नोंद घेतली आहे.कुठली अनुचित घटना घडू नये म्हणून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी गस्त घालतात. गस्तीसाठी काही चमूही तयार करण्यात आल्या आहेत. ती चमू सक्रिय राहत असल्याने पूर्वीच्या तुलनेत अवैध वृक्ष कत्तल आणि वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या प्रकाराला आळा बसल्याचे दिसून येते. गस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या चमूतील अधिकाऱ्यांकडून वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी माहिती जाणून घेतात. तसेच वरिष्ठ अधिकारी योग्य सूचनाही त्यांना करीत असल्याचे वन विभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले.आठ गस्त तर दोन विशेष पथकवन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील आठही वन परिक्षेत्र कार्यालयात गस्तीपथक तयार करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर तळेगाव आणि जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा येथे विशेष भरारी पथक तयार करण्यात आले आहे. अनुचित प्रकाराची माहिती मिळताच ही पथक तात्काळ घटनास्थळ गाठत असल्याने तसेच सदर पथकातील अधिकारी व कर्मचाºयांकडून सध्या वनसंपदा संवर्धनाचा उद्देश जोपासल्या जात असल्याने ही पथके फायद्याचीच ठरत आहेत.जिल्ह्यातील वन संपदा व वन्य प्राण्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करीत आहो. आमच्या कामाला नागरिकांचेही सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यात कुठेही वन कायद्याचे उल्लंघन होत असल्यास त्याची माहिती नागरिकांनी थेट वन विभागाच्या अधिकाºयांना द्यावी. तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.- सुहास बढेकर, सहाय्यक, वनसंरक्षक, वर्धा.५९ प्रकरणे न्यायप्रविष्टवन कायद्यान्वये दाखल गुन्ह्यापैकी १५४ गुन्हे न्यायदानासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी ५९ प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ट असून ३९ प्रकरणे सक्षम अधिकारी स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. तर ५६ प्रकरणे चौकशीत आहेत.९८ प्रकरणांचा निपटारावन कायद्यान्वे एकूण दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणांपैकी ९८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. निपटारा करण्यात आलेले ही प्रकरणे न्यायालयीन आणि विभागीय स्तरावरील असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी