४५ कोटींचा खर्च : एक लाख विद्यार्थिनींची सोयमहादेव नवले वर्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत आणखी २४४ नवीन बस वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या मानव विकास मिशनच्या ६२५ बस एस.टी. महामंडळाच्या अखत्यारित असून मुलींना मोफत प्रवास दिला जात आहे.मानव विकास मिशनद्वारे २२ जिल्ह्यातील १२५ तालुक्यात मिशनद्वारे विविध कार्यक्रम राबविल्या जात आहेत. आरोग्य सेवा पुरविणे-शैक्षणिक दर्जा उंचावणे, उत्पन्न वाढविणे यासारख्या योजना मिशनद्वारे राबविल्या जातात. घरापासून शाळेचे अंतर जास्त असल्याने अनेक मुली शाळा सोडून देतात तर काही जिल्ह्यात शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने मानव विकास मिशनद्वारे मुलींना शाळेत जाण्यास मोफत सेवा दिली जाते. हा उप्रकम गत चार वर्षांपासून सुरू असून नवीन वर्षासाठी २४४ बस मिशनद्वारे एस.टी. मंडळाला देण्यात येणार आ६हे. याकरिता शासनाकडून सुमारे ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
मुलींच्या शिक्षणासाठी २४४ नव्या बसेस
By admin | Updated: August 6, 2015 00:34 IST