शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सहा मार्गांवरील 236 वीजखांबांना 332 फलकांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST

शहरातील रस्ता दुभाजकावरील पोलवर फलक लावण्यास मनाई केली जात असली तरीही वारंवार फलक लावले जात होते. त्यामुळे पालिकेने या फलकांतून उत्पादनात भर पडावी म्हणून फलक लावण्यासंदर्भात एका एजन्सीला कंत्राट दिले आहे. परंतु हा कंत्राट फ्रेमचे फलक लावण्याचा असतानाही विनाफ्रेमच्याच फलकांची गर्दी जास्त दिसत आहे. हे सर्व अनधिकृत असून नगरपालिकाही याकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवर्ध्यातील सौंदर्यीकरणात बाधा : प्रसिद्धीच्या हव्यासात अनधिकृत फलक वॉर, नगरपालिकेकडूनही कारवाईकडे कानाडोळा

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराच्या सौंदर्यीकरणावर नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यवधीचा खर्च करण्यात आला आहे. त्यातूनच मार्गाच्या दुभाजकांवर रेडियम लावलेले विद्युत खांब उभारण्यात आले. त्यावर आता प्रसिद्धी मिळविण्यासाठी अनधिकृतरित्या फलक वॉर सुरू असल्याने शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा निर्माण झाली आहे.वर्ध्यातील सर्वच मार्गांचे सिमेंटिकरण आणि रूंदीकरण करण्यात आले असून या मार्गावरील दुभाजकांच्या सौंदर्यीकरणावरही भर दिला जात आहे. शहरातील आर्वी नाका ते पावडे चौक, आर्वी नाका ते कारला चौक, आर्वी नाका ते धुनीवाले चौक, शिवाजी चौक ते बजाज चौक आणि आंबेडकर चौक ते गांधी चौक या सहा मार्गांवरील दुभाजकातील जुने विद्युत खांब काढून त्या ठिकाणी नव्याने २३६ खांब लावण्यात आले. या सर्व खांबांना रेडियम असल्याने रात्रीच्यावेळी ते रेडियम चमकतात. त्यामुळे या मार्गावरून जाताना वर्धेकरांना प्रसन्न वाटते. परंतु आता सर्वच खांबांवर अनधिकृतरित्या फलक लावण्यात आल्याने अल्पावधीतच विद्रुपीकरणात वाढ झाली आहे. एका खांबाला एक नाही तर तीन ते चार फलक लावलेले असून काही खांबांवर आहे, तर काही खाली लोंबकळत आहे. हवेच्या झोतात ते लोंबकळणारे फलक धावत्या वाहनावर येऊन अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरपालिकेने या अनधिकृत फलक वॉरला चाप लावण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याची गरज वर्धेकरांकडून व्यक्त होत आहेत.

....अखेर पालिकेनेही दिला कंत्राट- शहरातील रस्ता दुभाजकावरील पोलवर फलक लावण्यास मनाई केली जात असली तरीही वारंवार फलक लावले जात होते. त्यामुळे पालिकेने या फलकांतून उत्पादनात भर पडावी म्हणून फलक लावण्यासंदर्भात एका एजन्सीला कंत्राट दिले आहे. परंतु हा कंत्राट फ्रेमचे फलक लावण्याचा असतानाही विनाफ्रेमच्याच फलकांची गर्दी जास्त दिसत आहे. हे सर्व अनधिकृत असून नगरपालिकाही याकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याचाच फायदा मोठ्या प्रमाणात विद्युत खांब अनधिकृत फलकांनी वेढलेले दिसून येत आहे.

एका खांबाचा खर्च वीस हजारांवर- शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून शहरातील सहा प्रमुख मार्गावरील दुभाजकावर रेडियम असलेले २३६ विद्युत खांब लावण्यात आले. या एका खांबाचा खर्च वीस हजारांपेक्षा अधिक आहे. रात्रीच्या वेळी या खांबांचे रेडियम चकाकत असल्याने सौंदर्य आणखीच खुलते. - परंतु आता या खांबावर फलकबाजी सुरू असल्याने फलका बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तारांमुळे या खांबांचे रेडियम खराब होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या खांबावरील रेडियम खराब होऊन सौंदर्याचाही बोजवारा उडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास या विद्युत खांबाकरिता पालिकेने केलेल्या कोट्यवधीचा खर्चही निरर्थक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विद्युत खांबावर फलक लावणाऱ्यांवर वारंवार कारवाई करूनही तीच परिस्थिती असल्याने त्यातून उत्पन्न मिळण्याच्या हेतूने त्याचे कंत्राट दिला आहे. केवळ फ्रेम असलेल्या फलकांनाच परवानगी आहे. फ्रेम असलेले फलक व्यवस्थित लावण्यासाठी व्यवस्था केली जाईल. विना फ्रेमचे फलक अनधिकृत असून त्यावर ताबडतोब कारवाईची माेहीम आरंभली जाईल. अतुल तराळे, नगराध्यक्ष

शहरात जवळपास २२ अधिकृत मोठे जाहिरात फलक असून ४० फलक अनधिकृत आहेत. अनधिकृत असलेल्या जाहिरात फलकांची माहिती संकलित करून त्यांना नोटीस बजावण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांनी दिल्या आहे. त्यानुसार त्यांना नोटीस देऊन दंडात्मक किंवा गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल तसेच दुभाजकावरील विद्युत खांबांवर फलक लावण्याचेही कंत्राट दिले आहे.निखिल लोहवे, सहायक मिळकत व्यवस्थापक, न. प. वर्धा  

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका