शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

२२ कोविड बाधितांवर होतोय उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 5:00 AM

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ४८ कोरोना बाधितांची नोंद घेतली आहे. त्यापैकी कोरोनाची लागण झालेले १९ व्यक्ती हे वर्धा जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या चार व्यक्तींपैकी तीन व्यक्ती हे वर्धा जिल्ह्याबाहेरील आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्याची रुग्ण संख्या २८ : सावंगीत १५ तर सेवाग्रामच्या रुग्णालयात सात कोरोना रुग्ण

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा प्रशासनाने रविवारी दोन कोरोना बाधितांची नोंद घेतली असली तरी त्यापैकी एक व्यक्ती नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात सात तर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात १५ असे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील एकूण २२ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. रविवारी वर्धा जिल्ह्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित निघाल्याने जिल्ह्याची रुग्ण संख्या २८ झाली आहे.जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ४८ कोरोना बाधितांची नोंद घेतली आहे. त्यापैकी कोरोनाची लागण झालेले १९ व्यक्ती हे वर्धा जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या चार व्यक्तींपैकी तीन व्यक्ती हे वर्धा जिल्ह्याबाहेरील आहेत. जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णांमध्ये अकोला जिल्ह्यातील पाच, वाशीम एक, औरंगाबाद तीन, मुंबई चार, ओडिशा एक, अमरावती चार, गोरखपूर (उ.प्र.) एक, नागपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण २८ कोरोना रुग्णांपैकी केवळ एकाचाच मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.कोरोना विषाणूचा संसर्ग पुरुषांना सर्वाधिकजिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ४८ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद घेतली आहे. यात १९ व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असले तरी ३० पुरुषांना आणि १८ महिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.चार व्यक्तींचा कोरोनाने घेतला बळीसध्या २२ व्यक्तींवर जिल्ह्यातील दोन कोविड रुग्णालयात उपचार सुरू असले तरी आतापर्यंत चार व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. या मृतकांमध्ये आर्वी तालुक्याच्या हिवरा (तांडा) येथील महिलेच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली.इत्यंभूत माहिती मिळविण्यासाठी भ्रमणध्वनीच्या ‘सीडीआर’चा वापरएखादी कोरोना बाधित रुग्ण जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहिती देण्यास सहकार्य करीत नसल्यास त्या व्यक्तीच्या मोबाईलचा सीडीआर काढून तो व्यक्ती नेमका कुठे-कुठे फिरला याची इत्यंभूत माहिती आरोग्य विभाग जाणून घेतो. आतापर्यंत काही व्यक्तींच्या मोबाईलचा सीडीआर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाने प्राप्त केला असून सदर माहितीबाबत मोठी गुप्तता बाळगली जात आहे.२२ व्यक्तींची कोरोनाला धोबीपछाडजिल्हा प्रशासनाने कोविड बाधितांची नोंद घेतलेला आकडा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरील असला तरी आतापर्यंत तब्बल २२ व्यक्तींनी कोरोनाला धोबीपछाड देत त्यावर विजय मिळविला आहे. यात जिल्ह्यासह बाहेरजिल्ह्यातीलही कोरोना रुग्णांचा समावेश आहे.रशियाचे तिघे संस्थात्मक विलगीकरणातरशियातून जिल्ह्यात परतलेल्या तिघांना खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. सदर तिघांचीही आरोग्य तपासणी केल्यावर त्यापैकी एकाला यात्री निवास येथे तर दोन व्यक्तींना पार्थ हॉटेल येथे क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या