शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

लाखावर लोकसंख्या सुरक्षेसाठी २० पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शहरात एकमेव पोलीस ठाणे आहे. ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहायक फौजदार, दहा हवालदार, नऊ नायक पोलीस आणि १५ शिपाई, याप्रमाणे अधिकारी सोडून केवळ ३५ पोलीस कर्मचारी आहेत.

ठळक मुद्देकारंजा तालुक्यातील वास्तव : गुन्हेगारीचा आलेख वाढताच

अरुण फाळके।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : लाखावर लोकसंख्या असलेल्या या तालुक्याकरिता पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ३५ जणांचा अपुरा फौजफाटा आहे. यातील प्रत्यक्ष २० पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर जनतेची सुरक्षा आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे पुरेसा पोलीस कर्मचारी द्यावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शहरात एकमेव पोलीस ठाणे आहे. ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहायक फौजदार, दहा हवालदार, नऊ नायक पोलीस आणि १५ शिपाई, याप्रमाणे अधिकारी सोडून केवळ ३५ पोलीस कर्मचारी आहेत. यापैकी न्यायालयीन कामासाठी ३, दारू प्रकरणे, अपघातांच्या घटनांमधील, अहवाल नागपूरवरून आणणे आणि नोटीस तामील करणे, महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था करणे या कामासाठी दररोज १५ पोलीस कर्मचारी लागतात, म्हणजेच जनतेच्या सुरक्षिततेसाठी व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ २० पोलीस कर्मचारी. त्यातील काही व्यक्तीगत सुटीवर जातात. महिला पोलिसांची प्रसूती रजा टाळताच येत नाही. या सर्व बाबींचा विचार केल्यास कारंजा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संख्या अत्यंत तोकडी पडत आहे. हा कर्मचारीवर्ग कारंजा तालुक्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरत आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचारी संख्या, व अधिकारी संख्या वाढवून देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे तालुकावासींनी केली आहे.बांगडापूर, सारवाडीत हवी चौकीबांगडापूर किंवा कन्नमवारग्रामसह सारवाडी या अतिदुर्गम व जंगलव्याप्त आणि आदिवासीबहुल परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी देण्यात यावी, ही सर्व गावे कारंजा पोलीस ठाण्यापासून ४० ते ५० किलोमीटर अंतरावर आहेत.या परिसरातून जाणाऱ्या वर्धा रस्त्यावर अनेक अपघात घडतात. लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. घनदाट जंगल असल्यामुळे अवैध व्यवसायाला वाव आहे. त्यावरसुद्धा नियंत्रण ठेवता येईल.१०२ गावे, ४९ ग्रामपंचायतीतालुक्यात १०२ गावे ४९ ग्रामपंचायती, एक नगरपंचायत असून एक लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. तालुक्यातील दोन टोकाच्या गावांमधील अंतर ८० किलोमीटरपेक्षा अधिक आहे.तालुक्याच्या मध्यभागातून महामार्ग क्रमांक ६ जात असून जंगलव्याप्त परिसर असल्यामुळे अपघात आणि गुन्हेगारीचे प्रमाणही लक्षणीय आहे. तुलनात्मक दृष्ट्या आर्वी, आष्टी तालुक्यापेक्षा या तालुक्यात गुन्ह्यांचे प्रमाणही अधिक आहे.

टॅग्स :Policeपोलिस