शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या 157 बसगाड्यांनी अर्ध्या रस्त्यात सोडली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील दुर्दशीत रस्त्यामुळे एसटीला टायर पंक्चर होणे, सुट्याभागांचे नुकसान होणे आदींचा नेहमीच फटका बसतो. क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, ट्रान्समिशन सिस्टममध्ये बिघाड निर्माण होणे, इंजिन बंद पडणे याशिवाय  इलेक्ट्रिकल अडचणींमुळे एसटी मध्येच नादुरुस्त होतात. यात बहुतांशवेळी प्रवाशांना धक्का मारावा लागतो. एखाद्या प्रवाशाला नियोजितस्थळी तातडीने जावयाचे असल्यास त्याच्याकडून अशावेळी संताप व्यक्त होतो.

ठळक मुद्देमेंटेनन्सवर कोटींचा खर्च : तोट्यात असलेल्या महामंडळाला परवडेना

सुहास घनोकार लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एसटी बसच्या देखभालीवर वर्षाकाठी कोटी रुपयाचा खर्च होत असला तरी त्या मध्येच नादुरुस्त होण्याचा अनुभव प्रवाशांना सातत्याने येत असतो. यामुळे प्रवासी परिवहन महामंडळाप्रती वैताग व्यक्त करताना दिसतात.  जिल्ह्यात मागील वर्षभरात बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर तब्बल १५७ बसेस पडल्या.  जिल्ह्यातील दुर्दशीत रस्त्यामुळे एसटीला टायर पंक्चर होणे, सुट्याभागांचे नुकसान होणे आदींचा नेहमीच फटका बसतो. क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, ट्रान्समिशन सिस्टममध्ये बिघाड निर्माण होणे, इंजिन बंद पडणे याशिवाय  इलेक्ट्रिकल अडचणींमुळे एसटी मध्येच नादुरुस्त होतात. यात बहुतांशवेळी प्रवाशांना धक्का मारावा लागतो. एखाद्या प्रवाशाला नियोजितस्थळी तातडीने जावयाचे असल्यास त्याच्याकडून अशावेळी संताप व्यक्त होतो.वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, पुलगाव, तळेगाव (श्यामजी पंत) आदी पाच आगार आहेत. हे पाचही आगार मिळून एकूण २२८ बसगाड्या आहेत. संपूर्ण विभागात एकूण १५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. एसटीच्या दररोज ३४० ते २५० किलोमीटर फेऱ्या होतात. कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात तब्बल सात ते आठ महिने एसटीची चाके जागीच रुतली. त्यामुळे एसटीच्या देखभालीवरील खर्चाचे प्रमाण यंदा कमी राहिले. सध्या एसटी पूर्णक्षमतेने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि जिल्हाबाहेर धावत असून, एसटी रस्त्यात मधेच बंद पडण्याचे प्रमाण सध्या तरी आढळून आले नाही.रस्त्यात एसटी बस बंद पडण्याची कारणे एसटी बसच्या देखभालीवर कोटीचा खर्च होत असला तरी गाड्यांमध्ये क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, ट्रान्समिशन सिस्टममध्ये बिघाड निर्माण होणे, इंजिन बंद पडणे, टायर पंक्चर होणे याशिवाय इलेक्ट्रिकल अडचणी आल्यास रस्त्यात मध्येच एसटी बस बंद पडतात. मात्र हे प्रमाण आता कमी झाले आहे.

दहा वर्षांवरील ९० बसेसवर्धा विभागांतर्गत वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजी पंत), पुलगाव आदी पाच आगार असून, एकूण २२८ बसगाड्या आहेत.  उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार १५ वर्षांपर्यंत बस वापरता येते. मात्र, वर्धा विभागांतर्गत साधारणत: ८ ते १० वर्षांपर्यंतच बसगाडीचा वापर केला जातो. १२ वर्षांनंतर बस स्क्रॅपमध्ये काढली जाते अथवा या गाड्यांचे रूपांतर मालवाहतूक गाडीत केले जाते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता वर्धा विभागाकडून सुस्थितीतील बसेस उपयोगात आणल्या जातात. तसेच बस गाड्यांच्या मेन्टेन्स कडेही लक्ष विशेष लक्ष दिले जाते, असे आगारातील सुत्रांकडून सांगण्यात आले. 

एसटीच्या देखभालीसाठी मोठा खर्च होतो. तो महामंडळाला परवडत नसला तरी प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी तो करावाच लागतो. सद्यस्थितीत आगारातील बसगाड्यांची स्थिती उत्तम आहे. बसगाड्या रस्त्यात मधेच बंद पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.पल्लवी चोकट, आगारप्रमुख, वर्धा. 

 

टॅग्स :state transportएसटी