शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्याच्या विकासासाठी १२५ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:30 IST

जिल्ह्याच्या विकासाकरिता महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीसाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १२५ कोटींची अतिरिक्त मागणी राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत केली आहे. यावेळी वाढीव निधी देण्यासंदर्भात अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मकता दर्शविली असून या निधीतून आरोग्य सुविधा,.....

ठळक मुद्देआरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या सुविधांना मिळणार बळकटी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याच्या विकासाकरिता महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीसाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १२५ कोटींची अतिरिक्त मागणी राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत केली आहे. यावेळी वाढीव निधी देण्यासंदर्भात अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मकता दर्शविली असून या निधीतून आरोग्य सुविधा, शिक्षण, अंगणवाड्या सक्षमीकरण व रोजगारांच्या संधी निर्माण करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण व रोजगाराला बळकटी मिळणार आहेनागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी नियोजनच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, अप्पर मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाने, उपवन संरक्षक सुनील शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी अंमलबजावणी यंत्रणांनी २७९ कोटी ३४ लाख रुपयांचे प्रस्ताव सादर केले होते. शासनाने १०७ कोटी ५७ लाख रुपयांची मर्यादा आखून दिली होती. अतिरिक्त मागणीमध्ये प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम, आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम व विस्तारीकरण, प्राथमिक शाळेचे बांधकाम व आवार भिंत, अपारंपारीक ऊर्जा, ग्रामीण रस्ते मजबुतीकरण इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अंमलबजावणी यंत्रणांनी १२५ कोटींची अतिरिक्त मागणी नोंदविली आहे. जिल्हा विकासासाठी हा निधी आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बैठकीत सांगितले. यावर बोलताना अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सांगितले. वाढीव निधीमधून आरोग्य सुविधा, शिक्षण व अंगणवाडी विकास यासोबतच शहरांच्या सुरक्षेसाठी ठिकाणी सीसीटीव्ही, पोलिसांची निवासस्थाने याबाबींवर खर्च करण्याचे सूचविले.नावीन्यपूर्ण योजनांचे केले कौतुकजिल्ह्यात लोकसहभागातून ३०० किमीचे पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करुन त्याचे मातीकाम केले आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावर या रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी निधी ठेवावा. तसेच कॉटन टू क्लॉथ हा चांगला उपक्रम असून हा प्रकल्प शाश्वत करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनीं सांगितले. जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे, असे सांगितले. कॉटन क्लस्टर, मत्स्यव्यवसाय, कौशल्य विकास, रेशीम उत्पादन, बचत गटांचे सक्षमीकरण या बाबींना प्राधान्य देण्यात यावे. वर्धा जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले. यातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Educationशिक्षणHealthआरोग्य