वर्षभरात आढळल्या 12 गर्भवती पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 05:00 AM2021-04-16T05:00:00+5:302021-04-16T05:00:15+5:30

जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होताच, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम मडावी यांच्या कार्यकाळात भविष्यातील गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात कोविडबाधित प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात महिलेसह नवजात शिशूंवर उपचार करण्यासाठी वेगळी व्यवस्था असावी, यावर विचार होत, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले, पण मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यात नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली. 

12 pregnant positives found throughout the year | वर्षभरात आढळल्या 12 गर्भवती पॉझिटिव्ह

वर्षभरात आढळल्या 12 गर्भवती पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देजिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थिती : कोरोना संकटकाळात स्वतंत्र प्रसूतीगृह ठरतोय मातांकरिता उपयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :  मागील एक वर्षाच्या काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांपैकी तब्बल १२ महिलांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात कोविडबाधित गर्भवती महिलेची दक्ष राहून प्रसूती करण्यासाठी वेगळा प्रसूतीगृहासह इतर व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था कोविड पॉझिटिव्ह प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात महिलेसाठी उपयुक्तच ठरणारी आहे.
जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होताच, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम मडावी यांच्या कार्यकाळात भविष्यातील गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात कोविडबाधित प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात महिलेसह नवजात शिशूंवर उपचार करण्यासाठी वेगळी व्यवस्था असावी, यावर विचार होत, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले, पण मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यात नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली. 
त्यामुळे या पर्यायी व्यवस्थेकडे थोडे दुर्लक्ष झाले, परंतु सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढल्याने, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक मडावी यांच्या कार्यकाळात नियोजित केलेली उपाययोजना सध्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या मार्गदर्शनात पुन्हा नव्या जोमाने ॲक्टिव्ह करण्यात आली आहे. वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांपैकी १२ महिलांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असला, तरी त्यापैकी १२ महिलांसह त्यांच्या नवजात शिशूला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर दोन महिलांसह त्यांच्या नवजात बालकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातच चांगले उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
 

संशयितांवर तज्ज्ञांचा राहतो वॉच
जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एखाद्या महिलेला सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास आदी त्रास होत असल्यास, त्या संशयित महिलेला इतर महिलांमध्ये न मिसळू देता तिला वेगळ्या खोलीत ठेवले जाते, शिवाय तिचा स्वॅब घेऊन तपासणीला पाठविला जातो, तसेच ही महिला अहवाल येईपर्यंत तज्ज्ञ डाॅक्टरांच्या निगराणीत राहते.
 

उपचारासाठी वेगळी व्यवस्था
प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास, तिला इतर रुग्णांत मिसळू न देता, तिच्यासह तिच्या नवजात शिशुवर रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या वेगळ्या खोलीत चांगले उपचार केले जातात. या महिलेसह तिच्या नवजात बालकावर तज्ज्ञ डॉक्टरांचा वॉच राहत असल्याचे सांगण्यात आले.

मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्यांपैकी १२ महिलांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी दहांना चांगली आरोग्यसेवा मिळावी, या हेतूने सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले, तर दोघींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या वेगळ्या व्यवस्थेत ठेवून उपचार देण्यात आले.
- डॉ.सचिन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा पॉईंट

 

Web Title: 12 pregnant positives found throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.