लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मंगळवारी ६३० व्यक्तींच्या कोविड चाचणीचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. त्यापैकी ११२ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रभावी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपम हिवलेकर यांनी केले आहे.कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याने आज ६१९ व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सध्या आयसोलेशन वॉर्डात ८१६ व्यक्ती आहेत. मंगळवारी ६४६ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. मंगळवारी एकाच दिवशी ११२ व्यक्ती कोविड बाधित आढळल्याने जिल्ह्यातील कोविड बाधितांची संख्या २ हजार ७४१ झाली आहे. तर मंगळवारी सात कोविड बाधितांनी उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतल्याने जिल्ह्याची कोविड मृतकांची संख्या ६१ झाली आहे. त्यापैकी एका व्यक्तीचा इतर आजाराने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी मंगळवारी ५६ व्यक्तींनी कोविडवर विजय मिळविला आहे.
मंगळवारी आढळले ११२ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:00 IST
कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याने आज ६१९ व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सध्या आयसोलेशन वॉर्डात ८१६ व्यक्ती आहेत. मंगळवारी ६४६ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. मंगळवारी एकाच दिवशी ११२ व्यक्ती कोविड बाधित आढळल्याने जिल्ह्यातील कोविड बाधितांची संख्या २ हजार ७४१ झाली आहे.
मंगळवारी आढळले ११२ कोरोना बाधित
ठळक मुद्दे५६ व्यक्तींचा कोविडवर विजय : ६३० व्यक्तींचे प्राप्त झाले अहवाल