शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

वर्धा जिल्ह्यात १४ महिन्यांत १०८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 13:34 IST

नापिकी, कर्जाचे ओझे, परतीच्या पावसाचा तडाखा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी दमछाक शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. मागील १४ महिन्यांत जिल्ह्यातील १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रशासकीय आकडेवारीच सांगते.

ठळक मुद्देकेवळ ७१ कुटुंबांना मिळेल शासनाकडून तोकडी आर्थिक मदत

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नापिकी, कर्जाचे ओझे, परतीच्या पावसाचा तडाखा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी दमछाक शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. मागील १४ महिन्यांत जिल्ह्यातील १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रशासकीय आकडेवारीच सांगते. निसर्ग आणि सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा निवडलेला मार्ग संवेदनशील मनांना हादरवून सोडणारा आहे.जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या १४ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १०८ शेतकऱ्यांनी सर्व दारे बंद झाल्याने खचून जात मृत्यूला कवटाळले. यापैकी केवळ ७१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाची मदत मिळणार आहे. शासनाच्या तोकड्या मदतीमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंब उभे राहू शकत नाही; पण शासनाच्या मदतीचे, उपाययोजनांचे आणि पॅकेजचे निकष हे शेतकऱ्याच्या जिवंतपणी लागू होत नसल्याची दारुण अवस्थाच या क्षेत्रातील जाणत्यांना अधिक वेदना देऊन जाते. शेतकरी आत्महत्यांची ३१ प्रकरणे प्रशासनाच्या सहभागासह गठित करण्यात आलेल्या समितीने अपात्र ठरविली आहेत. सहा प्रकरणे पुन्हा चौकशीकरिता विचाराधीन ठेवण्यात आली आहेत.जानेवारी २०१८ मध्ये १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. फेब्रुवारी महिन्यात ८, मार्च महिन्यात ८, एप्रिल १५, मे १०, जून ५, जुलै ६, आॅगस्ट ७, सप्टेंबर ८, आॅक्टोबर ९, नोव्हेंबर १३, डिसेंबर ४ तर यावर्षीच्या जानेवारी महिन्यांत २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. फेब्रुवारीत एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले.आत्महत्येच्या या आकडेवारीकडे बारकाईने पाहिले असता शेतकऱ्यांनी हंगामाच्या प्रारंभी आणि हंगामाच्या अखेरीस अधिक आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते. अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. तरीही पेरणी न साधण्याचे संकट ओढवले. कपाशीवर बोंडअळीने हल्ला चढविला. अशा अनेक संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला आहे.

मागील १८ वर्षांत १,६६१ शेतकरी आत्महत्या२००१ ते २०१८ या १८ वर्षांत तब्बल १,६६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मात्र, आत्महत्येची निम्मीच ८८२ प्रकरणे पात्र ठरली. ७७३ प्रकरणे शासनाच्या समितीने अपात्र ठरविलीत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या