शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यासाठी आता ३०२ नाही तर १०३ (१)

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 18:29 IST

१ जुलैपासून होणार अंमलबजावणी : जुने खटले जुन्या तरतुदींनुसारच चालणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खुनासारखा गंभीर गुन्हा केल्यानंतर आता यापुढे ३०२ नव्हे, तर १०३ (१) कलम दाखल करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रियासंहिता यामध्ये काही बदल केले आहेत. या कायद्यामध्ये केलेल्या नव्या सुधारणा, नव्या तरतुदी, नवीन कलमे १ जुलैपासून लागू केली जाणार असल्याची माहिती आहे.

याबाबत गुन्हेविषयक अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या मते या तीन नवीन कायद्यांमुळे देशभरात दहशतवाद, मॉब लिंचिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा अधिक कडक होणार आहे. नव्याने अंमलात येणाऱ्या भारतीय न्याय संहितेत २० नवीन गुन्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत, तर जुन्या आयपीसीमधील १९ तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत. तसेच ३३ गुन्ह्यांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा वाढविण्यात आली आहे. ८३ तरतुदींमध्ये दंडाच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय २३ गुन्ह्यांमध्ये अनिवार्य किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली असून, ६ गुन्ह्यांमध्ये 'सामुदायिक सेवा' या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

यापूर्वीचे तीन ब्रिटिशकालीन कायदे म्हणजेच भारतीय दंडसंहिता आता भारतीय न्यायसंहिता या नावाने तर फौजदारी प्रक्रिया संहिताऐवजी भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यापुढे भारतीय साक्ष अधिनियम या नावाने ओळखले जाणार आहेत. वरील सर्वच कायद्यांची तरतूद १ जुलैपासून लागू करण्यात येणार असली तरी यापूर्वी दाखल खटले जुन्याच तरतुदींच्या आधारेच न्यायालयात चालणार आहे.

नवीन कायदे अंमलबजावणीबाबत अभ्यास सुरूकेंद्र सरकारने आणलेल्या नवीन कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या स्तरावरून तसेच सरकारी पातळीवरून मार्गदर्शन केल्या जात आहे. शिवाय नवीन कायदे अंमलबजावणीबाबत काही पुस्तके आणि संदर्भ लेखदेखील असून, या सर्वांचा अभ्यास पोलिस अधिकारी, कर्मचायांकडून केला जात आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार नवीन कायद्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

'हिट अॅण्ड रन'मध्ये ट्रकचालकांना दिलासा• हिट अॅण्ड रन प्रकरणाशी संबंधित तरतुदीची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय ट्रकचालकांना केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वाहनचालकांच्याबाजूने हिंट अॅण्ड रन प्रकरणांशी संबंधित तरतुदीची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

• या तरतुदींना ट्रकचालकांनी विरोध केला होता. कायद्यातील तरतुदी समोर आल्यानंतर ट्रकचालकांनी कलम १०६ (२) च्या तरतुदीला विरोध केला होता.

• अतिवेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालवून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ओढवणाऱ्या आणि पोलिसांना घटनेची माहिती न देता पळून जाणाऱ्यांना १० वर्षाचा कारावास आणि दंडाची तरतूद आहे. ही तरतूद मात्र लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयwardha-acवर्धा