शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

5,016 करदात्या शेतकऱ्यांकडून वसूल झाली 1 कोटी 36 हजारांची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना कार्यान्वित केली. ...

ठळक मुद्देपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा बेकायदा मिळाला होता लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना कार्यान्वित केली. या योजनेचा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना लाभही मिळाला. पण त्यापैकी तब्बल १६ हजार ८८० शेतकरी करदाते असल्याचे पुढे येताच जिल्ह्यात धडक मोहीम राबवून शासकीय निधी परत गोळा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार १६ करदात्या शेतकऱ्यांकडून १ कोटी ३६ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांकडून शासकीय योजनेची ही रक्कम वसूल करण्याचे काम गाव पातळीवर तहसीलदारांच्या माध्यमातून केले जात आहे.पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेले तसेच करदाते शेतकरी याची शहानिशा जिल्हा प्रशासनाने केली असता तब्बल १६ हजार ८८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम वळती झाल्याचे पुढे आले. त्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात आहे. तालुका स्तरावर या मोहिमेचे नेतृत्व तालुका न्यायदंडाधिकारी तसेच तहसीलदार करीत असून आतापर्यंत ५ हजार १६ करदात्या शेतकऱ्यांकडून १ कोटी ३६ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा बेकायदा लाभ मिळालेल्या उर्वरित करदात्या शेतकऱ्यांकडून शासकीय निधी कसा परत मिळविता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. या मोहिमेत कारंजा तालुका पुढे असून वर्धा तालुक्यात केवळ ३.६२ टक्केच काम झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे वाढता कोविड संसर्गामुळे काही प्रमाणात या मोहिमेला ब्रेक लागला आहे. पण त्यावरही वेळीच मात करून नोटीस बजावण्यात आलेल्या व पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा बेकायदा लाभ घेतलेल्या प्रत्येक शेतकऱ्याकडून वेळीच शासकीय निधी कसा परत मिळेल यासाठी प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात आले. 

जूनच्या आत करावे लागणार पैसे परततब्बल दहा हजारांहून अधिक करदात्या शेतकऱ्यांकडून अजूनही शासकीय निधी वसूल करणे शिल्लक आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा बेकायदा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहे. नोटीसची दखल घेत आतापर्यंत ५ हजार १६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३६ हजारांची रक्कम परत केली आहे. पण अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे शासकीय निधी थकला आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत शासकीय निधीची रक्कम परत न केल्यास बेकायदा पंतप्रधान किसान सन्मान याेजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले.

इतर कारणांनी ९९४ शेतकऱ्यांना ठरविले अपात्रहवालदिल शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना कार्यान्वित करून त्यांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली. पण इतर कारणांनी ९९४ शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

माझे घोराड येथे शेत आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी कुठलाही अर्ज न करता बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली होती. आपण आयकर भरणारे असल्याने सदर रक्कम तलाठ्याकडे दिली आहे. त्याची पावतीही मला देण्यात आली आहे.- सुरज वरडकर, शेतकरी, घोराड.

मी शेतकरी आणि शिक्षक आहे. माझ्या खात्यावर तीन टप्प्यात सहा हजार रुपये जमा झाले. मी आयकर भरतो. त्यामुळे प्रशासनाने पैसे परत करण्यासंदर्भात नोटीस पाठविली होती. आपण तलाठ्याकडे पैसे परत करीत पावती केली. पण आता पुन्हा दोन हजार रुपये बँक खात्यात आले आहे. हा घोळ थांबविण्याची गरज आहे.- प्रशांत येळणे, शेतकरी, सिंदी (रेल्वे). 

आतापर्यंत नियमितपणे प्रत्येक टप्प्याचे दोन हजार रुपये जमा झाले. १४ मे रोजी घोषणा होऊनही बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही. पीएम किसान योजनेच्या लाभापासून आम्ही वंचित राहिलो आहे. तहसील कार्यालयात चौकशी केली असता कृषी विभागाकडे विचारणा करा असे सांगण्यात आले. तर कृषी विभागाने तहसीलमध्येच विचारणा करा असे सांगितल्याने अडचणीत भर पडली आहे.- वसंत सिरसे, शेतकरी, सिंदी (रेल्वे). 

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी