शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी...
2
Video: उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नात ३ खासदारांचा स्टेजवर डान्स; 'ओम शांती ओम' गाण्यावर थिरकले
3
अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्...
4
अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका
5
सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा
6
स्वस्त तिकीट, झिरो कॅन्सिलेशन फी, मोफत अपग्रेड..; Indigo संकट काळात Air India चा मोठा निर्णय
7
Goa Nightclub Fire:शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
8
इंडिगोच्या गोंधळानंतर सरकारचा कठोर निर्णय; विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित, रिफंडसाठी अल्टीमेट
9
भारत-अमेरिका संबंधांवर पुतीन भेटीमुळे फरक नाही; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे ठाम प्रतिपादन
10
धारावी-घाटकोपर जलबोगद्याला मंजुरी; सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेण्यास गती
11
धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग
12
भारतातूनच परतताच पुतिन यांच्यासाठी खूशखबर, रशियाला मिळाली मोठी ऑफर; अमेरिकेची झोप उडाली
13
काय सांगता! 'या' देशात पुरुषांची लोकसंख्या घटली; पती भाड्याने घेण्याची महिलांवर आली वेळ
14
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
15
झोंबणाऱ्या थंडीनं भरलं कापरं, उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
16
Goa Nightclub Fire: शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
17
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
18
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
19
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
20
Goa Nightclub Fire: गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २५ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 08:15 IST

forest fires in Uttarakhand: उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवे भडकत असून, नैनीतालपासून जवळ असलेल्या नैनीताल भवाली रोडवर पाईन्सच्या जंगलात भीषण आग लागली आहे. त्यामुळे जंगलातील एका मोठ्या भागाबरोबरच आयटीआय भवन जळालं आहे.

उत्तराखंडमधीलजंगलांमध्ये भीषण वणवे भडकत असून, नैनीतालपासून जवळ असलेल्या नैनीताल भवाली रोडवर पाईन्सच्या जंगलात भीषण आग लागली आहे. त्यामुळे जंगलातील एका मोठ्या भागाबरोबरच आयटीआय भवन जळालं आहे. नैनीतालमधीस लडियाकांटा क्षेत्रातील जंगलातही वणवा पेटला आहे. या भीषण वणव्यांमुळे नैनीताल येथून भवाली येथे जाणाऱ्या रस्त्यावर धुराचे लोट येत आहेत.तसेच वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

या भागात वारे मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. नैनीतालजवळील लडियाकांटा येथे लागलेली आग लष्कराच्या ताब्यात असलेल्या भागांपर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे लष्कराच्या जवानांकडूनही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रशासनाकडून हेलिकॉप्टरच्यामाध्यमातून नैनीताल आणि भीमताल येथील तलावांमधून पाणी नेऊन हा वणवा शमवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नैनीतालसह  कुमाऊंच्या जंगलांमध्येही आग लागली आहे. नैनीतालच्या बलदियाखान, ज्योलिकोट, मंगोली, खुरपाताल. देवीधुरा, भवाली, पाईनस, भीमताल मुक्तेश्वरसह आजूबाजूच्या जंगलांमध्येही वणवे पेटले आहेत.

यादरम्यान, नैनीताल जिल्हा मुख्यालयाजवळ लागलेल्या आगीने अधिकच भीषण रूप धारण केले आहे. त्यामुळे पाईन्स भागात असलेल्या हायकोर्ट कॉलनीतील रहिवासी भागाला धोका निर्माण झाला आहे. मात्र या वणव्यामुळे हायकोर्ट कॉलनीमध्ये अद्याप कुठलेही नुकसान झालेले नाही.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडfireआगforestजंगल