शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
4
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
5
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
6
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
7
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
8
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
9
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
10
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
11
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
12
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
13
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
14
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
15
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
16
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
17
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
18
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
19
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडचा मित्र बनला मोहरा, १९ वर्षांची नात निघाली आजीच्या हत्येची मास्टर माईंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 19:56 IST

Crime News: उत्तराखंडमधील ज्वालापूरमधील मोहल्ला चाकलान येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका वृद्ध महिलेच्या हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृद्धेची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर तिच्याच नातीने केल्याचे उघड झाले आहे.

उत्तराखंडमधील ज्वालापूरमधील मोहल्ला चाकलान येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका वृद्ध महिलेच्या हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृद्धेची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर तिच्याच नातीने केल्याचे उघड झाले आहे. बारावीत शिकत असलेल्या १९ वर्षीय नातीला आजीचं तिला बोलणं पसंत नव्हतं. त्यामुळे तिने तिच्या बॉयफ्रेंडच्या मित्रासोबत मिळून ६३ वर्षीय आजी अर्चना शर्मा हिची हत्या केली. 

मंगळवारी संपूर्ण कुटुंब घराबाहेर असताना नियोजनबद्ध रीतीने अर्चना शर्मा यांची हत्या करण्यात आली. हत्येसाठी आखण्यात आलेल्या प्लँननुसार उदित झा नावाचा तरुण मोहल्ला चकलान येथील घरी आला. त्याने अर्चना शर्मा यांना त्याची ओळख त्यांच्या नातवाचा मित्र अशी सांगितली.त्याने अर्चना शर्मा यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. अर्चना शर्मा या त्याला फ्रिजमधून पाणी आणून देण्यासाठी वळल्या.  त्याचवेळी उदित याने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर हातोड्याने वार केला. त्यानंतर तो तिथून फरार झाला. मंगळवारी दुपारी बाहेर गेलेले कुटुंबीय परत आले तेव्हा अर्चना शर्मा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्थितीत सापडला.

दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली. पोलिसांनीही सर्व बाजूंनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामधून संशयित तरुण ये जा करताना दिसून आला. पोलिसांनी ओळख पटवून त्याला तपासले. त्याच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली. त्याने स्वतःची ओळख उदित झा अशी सांगितली. मृत महिलेची नात, तिचा बॉयफ्रेंड अनुराग, तो (उदित), त्याची गर्लफ्रेंड असे चारही जण मित्र होते. दरम्यान, मृत महिलेच्या नातीने उदितला त्याचा आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा प्रायव्हेट व्हिडिओ तिच्याकडे असल्याचे सांगितले. तसेच उदित याने तिच्या आजीची हत्या न केल्यास ती तो व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी तिने दिली. मंगळवारी आजी घरी असल्याची माहितीही तिनेच दिली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttarakhandउत्तराखंड