शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 17:32 IST

Kedarnath Helicopter Emergency Landing: उत्तराखंडमधील जागृत देवस्थान असलेल्या केदारनाथ मंदिराजवळ (Kedarnath Mandir) आज एक मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला. केदारनाथ धाम येथे एक हेलिकॉप्टर आणीबाणीच्या परिस्थितीत हेलिपॅडपासून सुमारे १०० मीटर खाली उतरवावे लागले.

उत्तराखंडमधील जागृत देवस्थान असलेल्या केदारनाथ मंदिराजवळ आज एक मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला. केदारनाथ धाम येथे एक हेलिकॉप्टर आणीबाणीच्या परिस्थितीत हेलिपॅडपासून सुमारे १०० मीटर खाली उतरवावे लागले. या हेलिकॉप्टरमधून काही प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

शुक्रवारी सकाळी हे हेलिकॉप्टर केदारनाथ धाम हेलिपॅड पासून १०० मीटर आधी उतरवावे लागले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये हे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरला योग्य ठिकाणी उतरता येत नाही. तसेच हे हेलिकॉप्टर भरकटून हवेत गोल गोल फिरताना दिसते.  सुदैवाने पायलट या हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवतो आणि हे हेलिकॉप्टर हेलिपॅड पासून सुमारे १०० मीटर खाली यशस्वीपणे उतरवतो. 

या हेलिकॉप्टरमधून पायलटसह सहा प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांना घेऊन हे हेलिकॉप्टर सिरही हेलिपॅड येथून केदारनाथ धाम हेलिपॅड येथे येत होते. या प्रवासादरम्यान काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरला हेलिपॅडवर उतरता आले नाही. अखेरीस या हेलिकॉप्टरला हेलिपॅड पासून सुमारे १०० मीटर अंतरावर खाली उतरावे लागले. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही हानी झाली नाही. तरीही घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. सौरभ गहरवार यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सद्यस्थितीत केदारनाथ धाम येथे नऊ हेलिकॉप्टर सेवा सुरू आहेत.

टॅग्स :KedarnathकेदारनाथUttarakhandउत्तराखंड