शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील राम दरबारसह आठ मंदिरांत देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठा; विविध देवतांचे पूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:26 IST

२२ जानेवारी २०२४ नंतर प्रथमच महासोहळा

अयोध्या: गुरुवारी गंगा दशहराच्या मुहूर्तावर अयाध्येत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आयोजित भव्य धार्मिक सोहळ्यात पहिल्या मजल्यावरील श्री राम दरबारसह आठ मंदिरांमध्ये विविध देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्य दर्शनी भागातील शाही रूपातील ‘राजा राम’ मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा झाला.

वैदिक मंत्रोच्चारात झालेले हे धार्मिक अनुष्ठान मंदिरात आयोजित दुसरा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता. यापूर्वी २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्य रामलल्लाच्या मूर्तीस अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.

गुरुवारी अभिजित मुहूर्तावर या मंदिरांत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सकाळी साडेसहा वाजता विविध देवतांच्या मूर्तींचा अभिषेक यज्ञ मंडपातील पूजेसोबत सुरू झाला. राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा हा एक गौरवशाली आणि ऐतिहासिक प्रसंग आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

धार्मिक गुरू व वैदिक परंपरांनुसार विधी

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांच्यानुसार, हा समारंभ वैदिक परंपरेनुसार संपन्न झाला. या वेळी स्थानिक लोक आणि भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

असा होता सुरक्षा बंदोबस्त

अयोध्येत चारही दिशांना त्रिस्तरीय सुरक्षा होती. विशेष प्रशिक्षित सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ड्रोनभेदी तंत्रज्ञान, सीसीटीव्ही तसेच अत्यंत प्रगत देखरेख प्रणाली या वेळी ठेवण्यात आली होती.

या देवतांची प्राणप्रतिष्ठा

मुख्य मंदिर परिसरातील नियोजित जागी केंद्रस्थानी श्री राम दरबार, शेषावतार, ईशान्येला भगवान शिव, आग्नेय दिशेस श्रीगणेश, दक्षिण भागात श्री हनुमान, दक्षिण-पश्चिमेला श्री सूर्यदेव, वायव्येला देवी भगवती आणि उत्तरेला देवी अन्नपूर्णा अशा देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर