शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा खा. बृजभूषण सिंह यांच्या महिला समर्थकांचे अजब विधान; पत्रकारही झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 15:34 IST

संपूर्ण गौंडा जिल्ह्यात खासदारांनी कोणत्या महिलेसोबत असे केले नाही. महिला पैलवान जो आरोप लावतायेत तो चुकीचा आहे असं समर्थकांनी म्हणत बृजभूषण सिंह यांचा बचाव केला.

नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीत भारतीय कुश्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुश्तीपटू आंदोलन करत आहेत. आंदोलक खेळाडूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सरकारला १५ जूनपर्यंत अवधी दिला आहे. परंतु बृजभूषण सिंह त्यांची ताकद पूर्ण पणाला लावून आंदोलकांना उत्तर देत आहेत. त्यात गोंडा येथे भाजपा खासदार बृजभूषण यांच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तेव्हा बृजभूषण समर्थकांनी अजब-गजब तर्क लावत त्यांचा बचाव करताना दिसले. 

खासदार बृजभूषण सिंह यांच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांच्या पत्रकारांनी प्रतिक्रिया घेतल्या. त्यात एक समर्थक म्हणाला की, जर खासदार महिला प्रेमी असते तर, त्या महिला पैलवानाचे तोंड बघा, त्याहून एकापेक्षा एक सुंदर मुली इथं आहेत. खासदाराला कोणत्या गोष्टीची कमी आहे? असं विचारलं. तर दुसऱ्या महिला समर्थक म्हणाल्या, जर कुणी मुलगा आम्हाला छेडत असेल तर आम्ही त्याला सोडून देऊ? पलटवार करू, त्याला बूट-चप्पलांनी मारू, त्या तर महिला पैलवान आहेत. त्यांना ट्रेनिंग दिले जाते. त्यांनी खासदारांना कसे सोडले? जर त्यांच्यासोबत काही चुकीचे घडले असेल तर त्यांनी तात्काळ निर्णय घ्यायला हवा होता. २-४ वर्षांनी नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. इतकेच नाही तर आज खासदारांवर आरोप लावणे हा अन्याय आहे. महिला पैलवानापेक्षा आम्ही बेक्कार आहोत का? आम्हाला अर्ध्या रात्री बोलवू शकत नाही का? आमच्याकडे कुणी पॉवर ऑफ अटॉर्नी नाही, आम्ही त्यांचा विरोध करू शकत नाही. त्यांना आम्हाला रात्री बोलवता येऊ शकत नाही का? असा अजब बचाव महिला समर्थकांनी केला. 

दरम्यान, संपूर्ण गौंडा जिल्ह्यात खासदारांनी कोणत्या महिलेसोबत असे केले नाही. महिला पैलवान जो आरोप लावतायेत तो चुकीचा आहे. जर खासदारांविरोधात राजकारण होत असेल तर त्याचे उत्तर मिळेल असंही महिला समर्थकांनी म्हटलं. त्याचसोबत महिला पैलवान आंदोलन करत नाही तर त्यांना तिथे बसवलं गेलंय, विरोधी पक्षांनी योगी-मोदी यांच्या प्रतिमा मलिन करण्यासाठी हा डाव खेळला आहे. खासदारांवर लावलेले आरोप खोटे आहेत असंही खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या समर्थकांनी म्हटलं.  

टॅग्स :brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहBJPभाजपा