शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मायावतींनी पुन्हा एकदा भाच्याला उत्तराधिकारी घोषित केले, पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 14:55 IST

बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी पुन्हा एकदा आपला भाचा, आकाश आनंद यांना उत्तराधिकारी घोषित केले आहे.

Uttar Pradesh News :उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या(BSP) सुप्रीमो मायावती (Mayawati) यांनी पुन्हा एकदा आपला भाचा, आकाश आनंद (Akash Anand) यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले आहे. याशिवाय, त्यांची पुन्हा एकदा बसपाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. मायावतींनी रविवारी(दि.23) लखनौमध्ये बसपच्या सर्व राज्य प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये आकाश आनंददेखील उपस्थित होता. या बैठकीत आकाश यांना पुन्हा एकदा उत्तराधिकारी घोषित करण्यात आले.

आधी पदावरुन हटवले, आता...लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींनी भाचा आकाश आनंद यांना उत्तराधिकारी घोषित केले होते. तसेच, त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड करण्यात आली. यानंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान आकाश आनंद बसपाच्या अनेक प्रचारसभांमध्ये अतिशय आक्रमकपणे भाषणे देत होते. अशाच एका भाषणात त्यांनी भाजपला दहशतवादी पक्ष म्हटले. यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला होता. यानंतर मायावतींनी आकाशला बसपच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरुन हटवल्याची घोषणा केली. आकाशला अजून परिपक्व व्हायचे आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले होते. 

येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशातील 10 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. बसपाने यापूर्वी कधीही पोटनिवडणूक लढवली नाही, मात्र यंदा मायावतींनी पोटनिवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकाश आनंद यांना पुन्हा एकदा उत्ताधिकारी म्हणून घोषित केले असून, त्यांची राष्ट्रीय समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळेच आता उत्तर प्रदेशची जबाबदारी पुन्हा एकदा आकाश आनंद यांच्या खांद्यावर आली आहे. 

टॅग्स :mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश