शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

UP सरकारमध्ये मोठे फेरबदल होणार, मुख्यमंत्रिपदाबाबतही मोठा निर्णय, BJP पक्ष संघनेतही बदलाची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 13:18 IST

Uttar Pradesh BJP News: उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पराभवानंतर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आणि पक्षसंघटनेमधील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यामधील मतभेदही समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकार आणि राज्यातील पक्षाच्या संटनेमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये झालेली पक्षाची पीछेहाट भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशात पक्षाच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्याने भाजपाला केंद्रात बहुमतापासून दूर राहावे लागले होते. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पराभवानंतर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आणि पक्षसंघटनेमधील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यामधील मतभेदही समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकार आणि राज्यातील पक्षाच्या संटनेमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हे फेरबदल उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभेच्या १० जागांवरील पोटनिवडणुकीनंतर होतील. मात्र त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना बदलण्याची कुठलीही शक्यता नाही. तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आणि भाजपाच्या पक्षसंघटनेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या १० जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात खलबतं होत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडून करण्यात येत असलेल्या विधानांमुळे भाजपामध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता पुढे होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी भजपाकडून प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत एक बैठक घेत आहेत. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांच्या मंत्र्यांकडून पोटनिवडणुकीच्या तयारीबाबत माहिती घेत आहेत. तसेच पुढील रणनीतीबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे. लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर आता विधानसभेच्या पोटनिवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.   

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल