शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्टांचा संहार करूनच राष्ट्र सुरक्षित राहू शकतं, योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 11:25 IST

Yogi Adityanath News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरखपूर येथील गोरक्षपीठाचे पीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्राच्या सुरक्षेबाबत एक मोठं विधान केलं आहे. देशातील नागरिकांचं संरक्षण आणि दुष्टांचा संहार करूनच कुठलंही राष्ट्र सुरक्षित राहू शकतं. तसेच सुरक्षेच्या वातावरणामध्येच समृद्धीचं लक्ष्य प्राप्त करता येऊ शकतं, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरखपूर येथील गोरक्षपीठाचे पीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्राच्या सुरक्षेबाबत एक मोठं विधान केलं आहे. देशातील नागरिकांचं संरक्षण आणि दुष्टांचा संहार करूनच कुठलंही राष्ट्र सुरक्षित राहू शकतं. तसेच सुरक्षेच्या वातावरणामध्येच समृद्धीचं लक्ष्य प्राप्त करता येऊ शकतं, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

महंत दिग्विजयनाथ यांच्या ५६ व्या आणि महंत अवैद्यनाथ यांच्या ११ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित चर्चासत्राच्या पहिल्या दिवशी भारतासमोरील राष्ट्रीय सुरक्षेचं आव्हान या विषयावरील चर्चासत्राचं अध्यक्षपद भूषवताना योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांचं अभिनंदन करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, कुठलाही देश हा बाह्य रूपात सुरक्षित असेल आणि अंतर्गत रूपात सुरक्षित नसेल तर त्याला अराजक राष्ट्र मानलं जातं. असं अराजक निर्माण झालेलं राष्ट्र लवकरच समाप्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचतं. पाकिस्तान हे अशाच प्रकारच्या अराजक राष्ट्राचं उदाहरण आहे. अंतर्गत अराजकाने ते पूर्णपणे खिळखिळं झालं आहे. अराजकता कुठल्याही देशाला दुर्गतीकडे घेऊन जाते. या दुर्गतीमुळे अस्तित्वावर संकट निर्माण होतं. भारत प्राचीन काळापासूनच याबाबत सजग आणि सतर्क राहिलेला आहे, असेही योगी यांनी सांगितले.

योगी आदित्यनाथ यांनी पुढे सांगितले की, ही भूमी आपली माता आहे, असं शिक्षण भारतामध्ये वैदिक काळापासून दिलं गेलं आहे. कुठलाही सुयोग्य पुत्र आपल्या आईसोबत अराजक खपवून घेणार नाही.  भारत मातेच्या मानसन्मानासोबत कुणी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात प्रत्येक भारतीय उभा राहील. रामायण काळात अशा उपद्रवींचा नाश करण्यासाठी श्रीरामांनी ‘निसिचर हीन करहुं महि…’ या संकल्पाला रामराज्याची आधारशिला बनवले. तर भगवान श्रीकृष्णाने ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्’ या मंत्राचा वापर केला होता असे सांगत योगी म्हणाले की, नागरिकांचं संरक्षण आणि दुष्टांचा संहार हा राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अपरिहार्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी दिलेल्या पंचप्रणांचा उल्लेख करत योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, यामध्ये लष्करातील जवानांप्रतिही सन्मानाची भावना जपण्याचा संकल्प आहे. आपले जवान उणे ५० डिग्री तापमानामध्येही देशाच्या सुरक्षेसाठी पाहारा देत जागे असताता त्यामुळए देशातील नागरिक हे शांतपणे झोपू शकतात. भारताचं लष्कर हे जगातील सर्वश्रेष्ठ सैन्यांपैकी एक आहे, ही बाब भारतीांसाठी अभिमानास्पद आहे.  मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सद्यस्थितीत युद्धाची पद्धत बदललेली आहे. तसेच आपल्या सैन्याने शत्रूला त्याच्या मर्यादांची जाणीव करून दिली आहे, असेही योगी यांनी सांगितले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश