शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्यानगरीचे रूपडे पालटणार, विविध विकासकामांसाठी सरकारकडून २३ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 06:32 IST

Ayodhya Development Works: अयोध्येच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अयोध्या धामला जोडणाऱ्या सर्व ६ राष्ट्रीय महामार्गांपूर्वी १५ किलोमीटर अंतरावर पर्यटन सुविधा केंद्र बांधण्यासाठी सरकारकडून २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

- त्रियुग नारायण तिवारीअयोध्या - अयोध्येच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अयोध्या धामला जोडणाऱ्या सर्व ६ राष्ट्रीय महामार्गांपूर्वी १५ किलोमीटर अंतरावर पर्यटन सुविधा केंद्र बांधण्यासाठी सरकारकडून २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रादेशिक पर्यटन अधिकारी आर. पी. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार लखनौ, रायबरेली, आंबेडकरनगर आणि सुलतानपूर महामार्गावर पर्यटन सुविधा केंद्रांच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. बस्ती गोरखपूर मार्ग आणि गोंडा मार्गावर अद्याप जमीन खरेदी झालेली नाही.

अयोध्येत येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी अयोध्येपूर्वी १५ किलोमीटर अंतरावरील सर्व महामार्गांवर प्रवेशद्वार बांधण्याची योजना सुरू असून, त्यावर काम सुरू झाले आहे. ही संपूर्ण योजना डिसेंबर २०२४पर्यंत पूर्ण केली जाईल. हे सर्व प्रवेशद्वार वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातील आणि तेथे सुविधा केंद्र, बाजारपेठ, दुकानांचे बांधकाम, पार्किंग व्यवस्था, प्रवाशांसाठी निवासाची सोय आणि प्रादेशिक भागात मनोरंजनाची साधनेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

प्राणप्रतिष्ठेआधी विमानतळ होणार सुरू- अयोध्येत उभारले जात असलेले प्रभू श्रीराम विमानतळ प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आधी सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात देशांतर्गत विमाने सुरू केली जाणार असून ती दिल्ली, अहमदाबाद, मुंबईसाठी असतील. - विमानतळाचे संचालक विनोद कुमार यांनी सांगितले की, देशांतर्गत विमानांसाठी टर्मिनलचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सुरक्षा तपासणी, दुकानांची व्यवस्था केली जात आहे. अशा स्थितीत डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत विमाने सुरू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश