शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांनी नवजात अर्भकाला उन्हात ठेवण्याचा दिला सल्ला, नातेवाईकांनी अर्धा तास उन्हात ठेवलं, बाळाचा झाला मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 14:01 IST

Uttar Pradesh News: नवजात अर्भकाला ऊन दाखवण्याचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला बाळाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच दिवसांच्या मुलीला उन्हात ठेवल्याने तिचा मृत्यू झाला असून, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण मुलीला उन्हात ठेवल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

नवजात अर्भकाला ऊन दाखवण्याचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला बाळाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच दिवसांच्या मुलीला उन्हात ठेवल्याने तिचा मृत्यू झाला असून, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण मुलीला उन्हात ठेवल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर वाद वाढल्याने संबंधित डॉक्टर हा रुग्णालय सोडून पसार झाला आहे. तर सीएमओंच्या आदेशानुसार या रुग्णालयाला बंद करण्यात आलं आहे, ही घटना उत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथे घडली आहे.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मैनपुरीमधील घिरोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. येथील रहिवास असलेल्या विमलेश कुमार यांची पत्नी रीता हिने शहरातील साई रुग्णालयामध्ये पाच दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. मुलीच्या प्रकृतीबाबत काही समस्या असल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला अर्धातास उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला होता.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी साडे अकरा वाजता बाळाला रुग्णालयाच्या छतावर उन दाखवण्यासाठी ठेवलं. मात्र उन्हाची तीव्रता अधिक असल्याने काही वेळातच मुलीचा प्रकृती बिघडली. १२ वाजता नातेवाईकांनी तिला खाली आणलं. मात्र तिथे काही वेळातच तिचा मृत्यू झाला.

मुलीच्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे डॉक्टर रुग्णालय सोडून पसार झाला. दरम्यान, मृत मुलीच्या आईलाही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बाहेर काढल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून मैनपुरीचे सीएमओ डॉ. आर.सी. गुप्ता यानी पथक पाठवून रुग्णालय सील केलं आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.

दरम्यान, ही घटना परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आरोग्य विभागाकडून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. आता अधिक तपासानंतरच या नवजात अर्भकाचा मृत्यू नेमका कसा झाला, याची माहिती समोर येणार आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशHealthआरोग्यdoctorडॉक्टर