शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

यमुनेच्या पाण्यात अचानक फवारे उडू लागले; इंडियन ऑईलची गॅस पाईपलाईन फुटली, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:09 IST

अनेक दिवसांपासून यमुना, गंगा, शारदा यासह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. हिंडन नदीचे पाणीही नोएडामध्ये घुसू लागले आहे. 

उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्याच्या जागोश गावात यमुना नदीमध्ये इंडियन ऑईल कंपनीची गॅस पाईपलाईन फुटली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुराचे पाणी एवढ्या उंचीने उडत आहे की, एखादी मोठी घटना घडण्याची भीती सतावू लागली आहे. 

पाईपलाईनमधील गॅस मोठ्या वेगाने पाण्यातून बाहेर पडत आहे व हवेत पसरत आहे. पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच कंपनीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. परंतू, पाणी जास्त असल्याने काहीही करता येत नाहीय. यामुळे आसपास राहणाऱ्या लोकांना अलर्ट करण्यात आले आहे. 

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. कंपनीने याची माहिती लोकांना दिली आहे. व्हिडीओमध्ये पाण्याखालील पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा फवारा उडताना दिसत आहे. ही पानिपत-दादरी गॅस पाइपलाइन आहे. पहाटे तीन वाजता छपरौलीतील जागोश गावाजवळ ती फुटली. माहिती मिळताच अग्निशमन दल, पाटबंधारे विभाग आणि जिल्ह्यातील अधिकारी तिथे पोहोचले होते. 

गाझियाबादच्या जिल्हादंडाधिकार्‍यांच्या सूचनेनंतर गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. कोणतीही जिवीत हाणी झालेली नाहीय. परिस्थिती पाहून रिफायनरीशी संपर्क साधण्यात आला आहे. गॅसचा दाब कमी करून गळती कमी करण्याचे काम सुरू झाले. अचानक पाईपलाईन कशी फुटली याचे कारण समजू शकलेले नाहीय. यमुनेच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात दगड आदळल्याने पाइपलाइन फुटली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून यमुना, गंगा, शारदा यासह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. हिंडन नदीचे पाणीही नोएडामध्ये घुसू लागले आहे. 

टॅग्स :floodपूर