शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला बसलेल्या ९ जणांना चिरडले, ५ जणांचा मृत्यू , उत्तर प्रदेशमधील संभल येथे भीषण अपघात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 12:08 IST

Sambhal Accident News: उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे एका भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला बसलेल्या ९ जणांना चिरडले. या अपघातात ५ जण मृत्युमुखी पडले. तर ४ जण जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे एका भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला बसलेल्या ९ जणांना चिरडले. या अपघातात ५ जण मृत्युमुखी पडले. तर ४ जण जखमी झाले आहेत.  या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावातील महिलांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको करून वाहतूक बंद पाडली. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. 

हा अपघात संभलमधील राजापूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनूपशहर रोडवर असलेल्या भोपतपूर गावामध्ये झाला. मिळालेल्या माहितीनुसार भोपतपूर गावामध्ये काही लोक रस्त्याच्या कडेला बसले होते. त्यावेळी रस्त्यावरून एक भरधाव बोलेरो आली आणि तिथे बसलेलेल्या लोकांना चिरडून बाजूच्या झाडीत शिरली.  या अपघातात एका लहान मुलासह चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर उपचारांदरम्यान, आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अन्य चार जखमींना पोलिसांनी उपचारांसाठी रजपूरा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तिथून अधिक उपचारांसाठी त्यांना अलिगड येथे पाठवण्यात आले. 

दरम्यान, या अपघातानंतर संतप्त झालेल्या महिलांनी रास्ता रोको करत वाहतूक बंद पाडली.  त्यानंतर तिथे पोहोचलेल्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी त्यांची समजूत घालत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तसेच जिल्ह्याधिकारी आणि पोलीस अधीक्षकही घटनास्थळी दाखल झाले. अपघातात पाच व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गावात शोकाचं वातावरण आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात