शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

अयोध्येतील मंदिराची उभारणी विनासंकट व्हावी, म्हणून वर्षभरापासून रामनिवास मंदिरात होतोय यज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 07:17 IST

१० पंडितांच्या चमूकडून अखंड यज्ञकर्म; येवल्याहून अयोध्येत पोहोचली पैठणी

लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची उभारणी विनासंकट व्हावी, बाधा त्यात येऊ नये, यासाठी अयोध्येतच एक वर्षापासून अनोखा यज्ञ सुरू आहे. २६ जानेवारी २०२३ रोजी वसंत पंचमीला तो सुरू झाला.  रामकोट भागातील रामनिवास मंदिरात हा यज्ञ अखंड सुरू आहे. केवळ मंदिराचे काम विनासंकट व्हावे, एवढाच त्याचा उद्देश नाही, तर राम मंदिराची उभारणी करत असलेल्या सामान्य बांधकाम मजुरांपासून संबंधित सर्वांच्याच आयुष्यात कोणतेही संकट येऊ नये, हादेखील उद्देश असल्याचे यज्ञाचे प्रभारी आचार्य गोपाल पांडेय यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अयोध्या आणि परिसरातील १० पंडितांची एक चमू एक आठवड्यापर्यंत यज्ञकर्म करते. नंतरच्या आठवड्यात चमू बदलते. या पंडितांच्या आराम व भोजनाची व्यवस्था मंदिर परिसरातच आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार हे अलीकडेच एक दिवसासाठी यजमान बनले होते.

सकाळी ८ वाजता यज्ञ सुरू होतो. दोन तासांच्या यज्ञानंतर सूर्यास्तापर्यंत अखंड रामनाम संकीर्तन चालते. त्यानंतर देवदेवतांचे पूजन व अभिषेक केला जातो. नवग्रह हवन, अष्टोत्तर रामनाम हवन आणि आरती होते.

दरदिवशी वेगवेगळी पूजा

आठवड्यातील दरदिवशीची विशिष्ट पूजा वेगवेगळी असते. सोमवारी रुद्राभिषेक, मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण, बुधवारी गणपती अथर्वशीर्ष पठण, गुरुवारी पुरुष सुक्त, शुक्रवारी श्रीसुक्त ऋग्वेद, शनिवारी सुंदरकांड पाठ होतो.

येवल्याहून अयोध्येत पोहोचली पैठणी

नाशिक जिल्ह्यातील येवला या पैठणीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या शहरातून अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान होणारे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमानाच्या मूर्तींसाठी पैठणी व अन्य भरजरी वस्त्र पोहोचले आहेत. विशेष म्हणजे तीनशे दिव्यांग कारागिरांनी ही वस्त्रे तयार केली आहेत. येवला येथील कापसे फाऊंडेशनने ही अनोखी भेट पाठविली आहे. मंदिर ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांनी ही भेट स्वीकारली.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याyevla-acयेवला