शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

रामलल्लाचे गर्भगृहात आगमन; पूजा-अर्चा, विधींनी भारले वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 06:04 IST

ही पूजा वाराणसीचे आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड आणि त्यांचे सहकारी लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

- त्रियुग नारायण तिवारी

अयोध्या : श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात गुरुवारी रामलल्लाची मूर्ती आसनावर विधिवत पद्धतीने ठेवण्यात आली. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सुरू असलेल्या विधींपैकी एक असलेला गणेशपूजन, वरुणपूजा, जलाधिवास विधी पार पडला.

ही पूजा वाराणसीचे आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड आणि त्यांचे सहकारी लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी यजमान दाम्पत्य डॉ. अनिल मिश्रा व त्यांच्या पत्नी, ट्रस्टचे सचिव चंपत राय, कोषाध्यक्ष आचार्य गोविंदगिरी आदी उपस्थित होते.

आज कोणते विधी? प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शुक्रवारी औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास आणि धान्याधिवास विधी पार पडणार आहेत. त्यानंतर शनिवारी शर्कराधिवास, फलाधिवास आणि पुष्पाधिवास हे विधी होणार आहेत.

केंद्रीय कार्यालये, बॅंकांना अर्धा दिवस सुट्टीअयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्यामुळे २२ जानेवारी रोजी देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये अर्धा दिवस बंद राहणार आहेत, असे कार्मिक मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले. सार्वजनिक बँका, ग्रामीण बँका आणि विमा कंपन्या, वित्तीय संस्था व केंद्र सरकारी कार्यालयांना या दिवशी अर्धा दिवस सुट्टी जाहीर झाली आहे.

चार तास चालला आगमन सोहळापुजारी अरुण दीक्षित यांनी सांगितले की, रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात दाखल झाली आहे. ती प्रतिष्ठापित (विराजमान) झालेली नाही. मूर्ती गर्भगृहात आसनावर ठेवण्यात आली. या प्रक्रियेला ४ तास लागले. गुरुवारी ‘गणेश पूजा’ आणि ‘वरुण पूजा’ करण्यात आली. रामलल्लाची मूर्ती पाण्यात ठेवली गेली ज्याला ‘जलाधिवास’ म्हणतात. १२१ पुरोहितांना त्यांची पूजा कर्तव्ये सोपवली गेली आणि मंदिराच्या आवारात गर्भगृहाबाहेर वास्तूपूजा करण्यात आली. पूजन सोहळ्यावेळी सामूहिक रामायण पठण करण्यात आले.

अयोध्येत रस्त्यांवर धनुष्यबाणांच्या कलाकृतीअयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या आधी, शहर पूर्णपणे सजले आहे. भगवान राम आणि त्यांचे धनुष्यबाण दर्शविलेल्या कलाकृतींनी शहर सजले आहे. उड्डाणपुलावर पथदिवे बसवण्यात आले आहेत. पारंपरिक ‘रामानंदी टिळक’ थीमवर आधारित डिझाइन्स असलेले दीपस्तंभ लक्ष वेधून घेत आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या