शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांना मिळाले प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, कारसेवकांनाही आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 23:06 IST

मकर संक्रांतीनंतर सुरू होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या वैदिक विधींची माहिती घेत आदित्यनाथ यांनी अधिकार्‍यांना तीर्थ क्षेत्र ट्रस्टला सोहळ्याच्या सुरक्षा आणि इतर व्यवस्थेत सर्व आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

अयोध्या : 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात राम मंदिराच्या उभारणीत भूमिका बजावणाऱ्या काही कामगारांना आमंत्रित करण्यात आले आहे. यासोबतच ज्या कारसेवकांनी कार सेवेच्या वेळी प्रत्येकी 100 रुपयांची देणगी दिली होती, त्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. 

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी श्री रामलला आणि हनुमान गढीचे दर्शन आणि पूजन केल्यानंतर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचीही बैठक घेतली. मकर संक्रांतीनंतर सुरू होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या वैदिक विधींची माहिती घेत आदित्यनाथ यांनी अधिकार्‍यांना तीर्थ क्षेत्र ट्रस्टला सोहळ्याच्या सुरक्षा आणि इतर व्यवस्थेत सर्व आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "अयोध्येत अभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या मान्यवरांचा आदरातिथ्य व्हावा. प्रत्येक व्हीआयपी अतिथीच्या विश्रांतीची जागा आगाऊ निवडली पाहिजे. हवामानाचा विचार करता, काही पाहुणे एक-दोन दिवस आधी येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था व्हायला हवी. अयोध्येत हॉटेल आणि धर्मशाळा आहेत. होम स्टेची व्यवस्थाही उपलब्ध आहे. टेंट सिटींची संख्या वाढवण्याची गरज आहे. कुंभाच्या धर्तीवर अयोध्येत 25-50 एकरांवर भव्य टेंट सिटी बनवायला हवी."

याचबरोबर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 22 जानेवारीनंतर जगभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होतील आणि त्यांच्या सोयीसाठी संपूर्ण शहरात वेगवेगळ्या भाषांमधील फलक लावण्यात यावेत. हे मार्गदर्शक फलक संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या भाषांमध्ये आणि संयुक्त राष्ट्रांच्या सहा भाषांमध्ये असावेत. तसेच, 22 जानेवारीला सायंकाळी हरदेव मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या